नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी बस आगाराच्या जागेत उभे राहत असलेल्या बस टर्मिनलचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी 21 मजली इमारत उभी राहणार असून नऊ मजल्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. वर्षभरात जून 2023 पर्यंत इमारत उभारणीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एनएमएमटी व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे. वाशीतील बस आगार …
Read More »Monthly Archives: June 2022
‘विद्याभवनची कामगिरी कौतुकास्पद’
नवी मुंबई : बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाचा 21 व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी विद्याभवन शिक्षण संकुलाच्या 21 वर्षांच्या कामगिरीची प्रशंसा केली. स्व. डॉ. शं. पां. किंजवडेकर आणि संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे यांच्या अथक परिश्रमातून 18 जून …
Read More »आला पावसाळा आरोग्य सांभाळा!
दीर्घकाळ भिजलेल्यावर बुरजीजन्य संसर्गाचा धोका; लक्षणांकडे दुर्लक्ष नको; डॉक्टरांनी दिला इशारा नवी मुंबई : बातमीदार डोळ्यांच्या किंवा त्वचेच्या संसर्गाप्रमाणेच कानाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पहायला मिळते. हा संसर्ग कानाच्या आतील, मध्य किंवा बाह्य भागावर परिणाम करू शकतो. पावसात दीर्घकाळ भिजणार्या व्यक्तींमध्ये कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढत असून स्वतःच्या मर्जीने …
Read More »मुरूड एसटी आगारातील गैरसोयी दूर करा
अन्यथा आंदोलन करणार -अरविंद गायकर मुरूड : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकामधील शौचालयांची अस्वच्छता, पिण्याचे पाणी व प्रवासी शेडमधील पंख्याची गैरसोय त्वरीत दूर न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा मुरूड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी एसटीच्या रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना निवेदनाद्वारे दिला आहे. मुरूड एसटी स्थानक हे …
Read More »वाढत्या इस्मालिक जिहादी कट्टरता व हिंसाचाराचा कर्जतमध्ये निषेध
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार देशातील वाढत्या इस्मालिक जिहादी कट्टरता व हिंसाचाराचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. अखिल भारतीय धर्मप्रसार समिती सदस्य दीपक गायकवाड, क्षेत्र संघटन प्रमुख श्रीरंग राजे, कोकण प्रांत धर्मप्रसार प्रमुख सुरेश गोखले, जिल्हा मंत्री …
Read More »द्रुतगती मार्गावर टेम्पो-ट्रकचा अपघात
टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर शुक्रवारी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कोंबड्या वाहून नेणार्या टेम्पोची पुढील ट्रकला धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक नयूम दुस्तीगीर शेख (वय 41. रा उस्मानाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, याच सुमारास वेगवेगळ्या …
Read More »कुरूळमध्ये उभारणार दीपस्तंभ
हिमांशू सहानी आणि सुभाष दिडवळ यांचा पुढाकार अलिबाग : वार्ताहर सामाजिक जाणिव आणि धार्मिक भावना यांची सांगड घालून अलिबागेतील हिमांशू सहानी व सुभाष दिडवळ यांनी स्वखर्चाने कुरुळ येथे दीपस्तंभ उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बुधवारी सकाळी कुरुळ येथील हनुमान मंदिरासमोर उपसरपंच स्वाती अरुण पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. …
Read More »गव्हाण विद्यालयात चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण विद्यालयाने एचएससी व एसएससी अर्थात दहावी आणि बारावीच्या बोर्डा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा राखली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत …
Read More »उरणमध्ये विकासकामांचा शुभारंभ
दिघोडे येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावात विविध विकासकामांचा शुभारंभ झाला असून या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे गावात जाणार्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. नागरिकांना त्याचा त्रास होत होता, ही समस्या लक्षात घेत …
Read More »पहिल्याच पावसात पालीत दाणादाण
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची त्रेधातिरपीट पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली शहरात शनिवारी (दि. 18) जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसात पालीत दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक व नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पाली शहरातील भोईआळी परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने तेथील मुख्य …
Read More »