केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्था अग्निपथ योजनेत होणार्या मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच अग्निपथ योजनेची घोषणा केली, परंतु काही ठिकाणी अग्निपथ योजनेचा माहिती न घेताच विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह …
Read More »Monthly Archives: June 2022
12व्या वर्षीच मॅट्रीक पास! खारघरमधील विद्यार्थ्याची कमाल; 62 टक्के गुण
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील एका 12 वर्षीय मुलाने चक्क दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. सहजप्रीत सिंह असे या मुलाचे नाव असून तो दहावीत 62 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. दहावीत यश मिळवणारा सहजप्रीत हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा मुलगा ठरला आहे. सहजप्रीत हा खारघरच्या केपीसी शाळेत …
Read More »बिरवाडी नदीपात्रात आरटी-पीसीआर टेस्ट किटचे साहित्य
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बिरवाडी तर्फे कांबळे येथील स्मशानभूमीजवळ असणार्या नदीपात्रात कोविड टेस्ट करण्यासाठी लागणारे आरटी-पीसीआर टेस्ट किटच्या वस्तू आढळून आल्या. त्याचे वृत्त समजताच एमआयडीसी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. आरटी-पीसीआर टेस्ट किट व इतर वस्तूचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. वारंवार होणार्या …
Read More »सुरक्षारक्षक तैनात करून पांडवकडा धबधबा पर्यटनासाठी खुला करावा
खारघर-तळोजा भाजप मंडलची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील पांडवकडा धबधबा परिसरात यंदाही पर्यटकांना शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. येथे होणार्या दुर्घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, पण योग्य प्रकारे सुरक्षारक्षक तैनात करून पावसाळ्याच्या चार महिन्यांपुरता हा परिसर पर्यटनासाठी खुला करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलातील …
Read More »जिजाऊ रथाचे महाडमध्ये जल्लोषात स्वागत
महाड : प्रतिनिधी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा येथून पाचाड येथे आलेल्या जिजाऊ रथाचे स्वागत शुक्रवारी (दि. 17) सकाळी नवयुग विद्यापीठ ट्रस्ट लाडवली (ता. महाड) येथे मोठ्या जल्लोषात करण्यात आले. राजमाता जिजाऊ मांसाहेब यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा येथील त्यांच्या जाधवराव वंशजांनी जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शक्तिस्थळ सिंदखेडराजा ते …
Read More »पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून विविध कामांचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील महापालिका हद्दीत मान्सून सक्रिय होण्यापूर्वी वेगाने कामे सुरू आहेत. या अनुषंगाने खारघर येथील मुर्बी आणि पेठगाव या भागात नालेसफाईच्या तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला तसेच या कामासंदर्भात अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. …
Read More »भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचा लूट हा कॉमन प्रोग्राम
माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांचा घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारला राज्यातील जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. फक्त स्वतःचे भले करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले असून लूट, लूट आणि लूट हा महाविकास आघाडी सरकारचा कॉमन प्रोग्राम आहे, अशी घणाघाती टीका …
Read More »नेरळ विद्या विकासचा निकाल 100 टक्के; जयेश चौधरी प्रथम
कर्जत : बातमीदार विद्या विकास मंडळाच्या नेरळ गावातील विद्या विकास मंदिर या शाळेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. जयेश नवल चौधरी याने दहावीच्या परीक्षेत 93.80 टक्के गुण मिळवून नेरळ विद्या विकास शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. हर्षवर्धन संतोष मगर (93 टक्के) दूसरा तर किर्तिशा राजेंद्र म्हात्रे (92 टक्के) …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या विकासनिधीतून मिळाली सुसज्ज रुग्णवाहिका
पालीत लोकार्पण सोहळा, नागरिकांना मिळणार मोफत सेवा पाली : रामप्रहर वृत्त आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून सुधागड तालुक्याला एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी (दि. 16) आमदार पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 24
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारतात सध्या एलआयसीसह एकूण किती जीवन विमा कंपन्या आहेत? अ. 24 आ. 20 इ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper