Breaking News

Monthly Archives: July 2022

पावसाळी हंगामात रानभाज्या बहरल्या

मुरूड : प्रतिनिधी दमदार पावसामुळे बाजारात रानभाज्या विक्रीसाठी आल्या असून औषधी गुणांमुळे खवय्यांची त्यास पसंती लाभत आहे. यातून कष्टकरी, आदिवासींना पावसाळी हंगामात रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे. कोकणाला मोठे वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती या प्रांतात आढळतात. याचबरोबर आरोग्यवर्धक रानभाज्या पावसाळ्यात उगवतात. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्या जातात. …

Read More »

पूरग्रस्तांना आधी मदत मग पुनर्वसन!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; वर्ध्यात पाहणी वर्धा : प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कान्होली गावास भेट दिली. पूरग्रस्तांना आधी अधिकाधिक आर्थिक मदत …

Read More »

ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करा : रामदास कदम

मुंबई : प्रतिनिधी माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का? हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचे आत्मचिंतन करा, असा सल्लाही त्यांनी …

Read More »

आक्कादेवी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली जंगल सत्याग्रह झालेल्या आक्कादेवी माळरानाच्या धरणावर रविवारच्या सुटीनिमित्त उरण, पनवेल व नवी मुंबई येथील पर्यटकांनी धरणात पोहण्याबरोबर धरणातून फेसळणार्‍या पाण्यावर रोमहर्ष मजा लुटण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. यामुळे …

Read More »

खारघरमध्ये पालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात

खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने खड्डे, पदपथ दुरुस्ती आणि खुल्या गटारावर झाकण बसविण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र खारघर परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम पनवेल महापालिकेकडून केली जात आहे. त्यामुळे सिडकोने नेमलेल्या ठेकेदाराने कोणती कामे केली, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खारघर वसाहत …

Read More »

39 प्रभागांतील मतदार संख्येत बदल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त काही दिवसांपूर्वी आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी शनिवारी अंतिम करण्यात आली आहे. यात प्रारूप यादीच जाहीर केलेली 8,45,524 मतदार संख्या कायम ठेवण्यात आली आहे. 41 प्रभागांपैकी  प्रभाग क्रमांक 1 व 21 हे 2 प्रभाग वगळता इतर 39 …

Read More »

पारगाव, डुंगीत पावसाचे पाणी शिरून नुकसान; तहसीलदारांनी केली पाहणी

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळबाधित पारगाव व डुंगी गावात पावसाचे पाणी जाऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. या संदर्भात तहसीलदार विजय तळेकर यांनी पाहणी केली. विमानतळबाधित पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारगाव व डुंगी गावात सन 2017-18पासून पावसाच्या पाण्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत …

Read More »

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का

दिघा विभागातील माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश नवी मुंबई : बातमीदार दिघा विभागातील दिग्गज माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते आणि गवते परिवाराने त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह स्वगृही म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये मंगळवारी (दि. 19) प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. माजी प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटीयन, माजी …

Read More »

बुडत्याचा पाय खोलात

एकंदर राजकारणाच्या पटलावर नजर टाकली की शिवसेनेचे अध:पतन ठळकपणे दिसून येते. अर्थात, येथे शिवसेना या शब्दाचा अर्थ उद्धव ठाकरे समर्थकांचा गट असा घ्यायचा. पक्ष प्रमुखपदी ठाकरे यांचे नाव अजुनही कायम असले तरी पक्षनेतृत्वाचा अक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच निर्देश करताना दिसतो. शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाचे उत्तर बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील …

Read More »

धोकादायक दरडींवर उपाययोजना आवश्यक

वरंध भोर आणि महाबळेश्वर या दोन्ही घाट मार्गात सातत्याने दरडी कोसळत असल्याने या दोन्ही घाटातील वाहतूक मंदावली आहे. त्यातच प्रशासनाने अवजड वाहतूक बंद केली आहे. भितीपोटी लहान वाहनचालकांनी या घाटाकडे पाठ फिरवली आहे. महाडकरांच्या यातना काही संपता संपत नाहीत तर यामुळे या मार्गावरील पावसाळी पर्यटनालादेखील फटका बसला आहे. मात्र पर्यटकांनाही …

Read More »