Breaking News

Monthly Archives: July 2022

नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांना विविध पर्याय

आमदार प्रशांत ठाकूर यांचे करिअर शिबिरात मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) रायगड विभागाच्या वतीने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर भरारी 2022 हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेकडून वृक्षलागवड

कर्जत : बातमीदार नेरळ- माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने माथेरान घाटातील वॉटरपाईप परिसरातील ओसाड जागेवर वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था गेल्या दहा वर्षांपासून माथेरानच्या डोंगरात वृक्षलागवड करीत आहे. गेली दहावा वर्षे सातत्याने …

Read More »

वैजाळी शाळेत आरोग्य तपासणी शिबिर

अलिबाग : रामप्रहर  वृत्त माणुसकी प्रतिष्ठान-जितनगर व हाशिवरे हितवर्धक मंडळाची वैजाळी इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मोफत आरोग्य व दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सरोज डाकी, मुख्याध्यापक  प्रतिभा म्हात्रे, प्रज्ञा धसाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे तीनशे मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार …

Read More »

सारळ पूल झाला कमकुवत

अलिबाग़ ़: प्रतिनिधी तालुक्यातील बहुचर्चित चोंढी-रेवस मार्गावरील सारळ समुद्र किनार्‍याजवळील दगडी पूल पुन्हा एकदा कमकुवत म्हणून घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले आहे. तसे फलक पुलाच्या दोनही बाजूला लावण्यात आले आहेत. 1980 च्या दशकात सारळ समुद्र किनार्‍यावर दगडी पूल उभारण्यात आला होता. …

Read More »

कर्जतच्या आदिवासी भागात पुन्हा मोबाइल युनिटची आरोग्य सेवा

कर्जत : बातमीदार केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील आदिवासी भागासाठी दोन फिरते दवाखाने चालविले जात होते. मात्र आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पगार थकल्याने हा फिरता दवाखाना 2018 मध्ये बंद करण्यात आला होता. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानने कर्जत तालुक्यातील कशेळे येथे मुख्यालय असलेले हा फिरता दवाखाना पुन्हा सुरू …

Read More »

पेण, रोह्यात पावसामुळे दाणादाण

पेणमध्ये दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत पेण : प्रतिनिधी तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत असून, नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यात तालुक्यातील दोन व्यक्ती वाहून गेल्या. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पेण तालुक्यातील मुंगोशी येथील लक्ष्मण काशिनाथ चौरे (वय 42) हे सोमवारी मासेमारी करण्यासाठी गेले असता पावसाच्या …

Read More »

कृषी संजीवनी मेळाव्यातून महाड तालुक्यातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील विन्हेरे परिसरात कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मेळाव्याच्या माध्यामतून शेतकर्‍यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. नुकतेच राजिवली गावात कृषी तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाड तालुक्यात आतापर्यंत 134 ग्रामपंचायतीमध्ये कृषी संजीवनी मेळावे आयोजित केले गेले आहेत. कृषी संजीवनी मेळाव्यांतून महाड तालुक्यातील शेतकर्‍यांना भात बियाणे, बियाणे …

Read More »

पेण-दिवा रेल्वे मार्गावर दोन नव्या मेमू गाड्या

पेण : प्रतिनिधी मध्य रेल्वेने पेण-दिवा मार्गावर मंगळवारी (दि. 5) पासून दोन नव्या मेमू गाड्या सुरू केल्या असून, त्याबद्दल पेणमधील प्रवाशांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पेणकरांना जास्तीत जास्त एक्स्प्रेस गाड्या आणि मेमू गाड्या मिळाव्यात, अशी मागणी मी पेणकर आम्ही पेणकर या संघटनेने केली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर रोज …

Read More »

रायगड एलसीबी अधिकार्‍यांना मालमत्ता हस्तगत पुरस्कार

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्याकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखे (एलसीबी)तील अधिकारी व अमलदारांना देऊन गौरविण्यात आले. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत या करीता महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालकांनी एकूण 11 गुन्ह्यांची पोलीस महासंचालकांकडे शिफारस …

Read More »

पोलादपुरात अपंगांकडून वृक्षारोपण; आमदारांकडून कौतुक

पोलादपूर ़: प्रतिनिधी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस पोलादपूर तालुक्यातील अपंग बांधवांच्या संघटनेकडून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार भरत गोगावले यांनी या अपंगांचे कौतुक केले. आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त  तालुक्यातील अपंग बांधवांनी पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नगरपंचायत कार्यालय, पोलीस …

Read More »