खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजता केला गेला. या कार्यक्रमाच्या प्रमुखपदी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य संजय पाटील हे होते. संजय …
Read More »Monthly Archives: August 2022
रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच महोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणजे 15 ऑगस्ट रोजीचे शानदार ध्वजारोहण. हा ध्वजारोहणाचा सोहळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य संजय पाटील …
Read More »खारघरमधील रक्तदान शिबिरास प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त युवा प्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ, खारघर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी सलग बारावे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 81 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, तसेच परिसरातील नागरिकांसाठी साईदृष्टी डव्हान्स सेंटर फॉर परफेक्ट व्हिजन, सानपाडा या हॉस्पिटलच्या वतीने …
Read More »कामगार भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या
न्हावा-शेवा कंटेनर टर्मिनलप्रश्नी रवींद्र पाटील यांनी वेधले लक्ष उरण : वार्ताहर जेएनपीएने खासगीकरण करून 30 वर्षांसाठी चालविण्यासाठी दिलेल्या न्हावा-शेवा कंटेनर टर्मिनलमध्ये प्रशासनाकडून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून परस्पर परप्रांतीय कामगारांची सुरू असलेल्या कामगार भरतीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. कंपनीने चालवलेली थेट कामगार भरतीची प्रक्रिया तत्काळ बंद न केल्यास जेएनपीए प्रशासनाच्या विरोधात …
Read More »माणगावजवळ ओढ्यात आढळली बेवारस कार
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील चांदोरे गावाच्या हद्दीत ओढ्यामध्ये बेवारस स्थितीत पडलेली एक कार पोलीस व रेस्क्यू टीमने मंगळवारी (दि. 16) क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. बेवारस स्थितीत ओढ्यामध्ये सापडलेल्या या कारबद्दल नागरिकांत चर्चा रंगल्या आहेत. चांदोरे गावच्या हद्दीतील ओढ्यात एक कार (एमएच 14-डीएफ 4167) पडली असल्याची माहिती ग्रामस्थ सुजित शिंदे …
Read More »रायगडात पक्ष्यांची दुनिया बहरली
विविध प्रजातींचे दर्शन, अभ्यासक, निरीक्षकांना पर्वणी सुधागड : रामप्रहर वृत्त दमदार पावसाने निसर्ग खुलला असून पक्ष्यांसाठी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सध्या देशी-परदेशी पक्ष्यांचे दर्शन होत आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना ही पर्वणी मानली जात आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात विविध पक्ष्यांचे दर्शन घडते. अनेक पक्षांचा हा विणीचा हंगामसुद्धा …
Read More »स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी समूह राष्ट्रगीत गायन
पनवेल मनपाही होणार उपक्रमात सहभागी पनवेल : प्रतिनिधी स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत …
Read More »अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तसेच श्रावणी सोमवार व संकष्ट चतुर्थीनिमित्त केदार भगत मित्र परिवारकडून पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल लिंक आणि पोस्टाची सुकन्या समृद्धी खाते मोफत काढून देण्यात आले. याचा …
Read More »बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवार (दि. 16)पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवे सरकार सज्ज झाले असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे व सहकारी आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव …
Read More »काळरात्रीनंतरच धडा घेणार का?
रविवारी सकाळ उजाडली ती, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमुख विनायक मेटे हे त्यांच्या अपघाती निधनाची बातमी घेऊनच. काही त्यांच्या निधनाची बातमी सर्वदूर पोचली आणि सारे जण सुन्न झाले. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघाताबाबत अनेक मुद्दे पुढे आले आहेत. दरम्यान अपघाताच्या चौकशीचे आदेश तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विनायक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper