रेल्वे विभागाकडून लोकल प्रवाशांना सुविधा मुंबई : प्रतिनिधी गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर रेल्वेचा बोरीवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. एमयूटीपी-3 ए अंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात येत असून या प्रकल्पात हार्बरवरील मालाड स्थानक उन्नत होणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी-अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक …
Read More »Monthly Archives: September 2022
“मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू”
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये घोषणा नांदेड : प्रतिनिधी नांदेडमध्ये शनिवारी (दि. 17) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण करून शहिदांना मानवंदना दिली. या वेळी त्यांनी विकासाचा अनुशेष भरून काढून मराठवाड्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ, लवकरच हा विभाग दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा …
Read More »पनवेलमध्ये स्वच्छ अमृत महोत्सवाच्या रॅलीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद
महापालिकेचा उपक्रम पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त पनवेल व कळंबोलीत पायी रॅली (पदयात्रा), स्वच्छता मोहीम आणि खारघरमध्ये सायकल रॅलीचे आयोजन महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. 17) करण्यात आले होते. या रॅलीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळाला. पनवेल महापालिका मुख्यालय ते वडाळे तलावदरम्यान काढण्यात आलेल्या पायी रॅलीत आमदार प्रशांत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 250 बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या (दिव्यांगजन) खारघर केंद्रात शनिवारी (दि. 17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने 250 बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे (किट) वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर साजरा होत आहे. याचे …
Read More »झोकून देऊन काम करा; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन
सेवा पंधरवडा आयोजनासंदर्भात आढावा बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्त आजपर्यंत आपण सर्व झोकून देऊन काम करीत राहिलो आहे. त्याच प्रमाणे येणार्या कालावधीतदेखील अशाच प्रकारे कार्यरत राहिल्यास आपण अधिक चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करू शकतो, असे प्रतिपादन भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) केले. ते सेवा पंधरवड्याच्या …
Read More »गौरा गणेशोत्सवानिमित्त नवीन पनवेलमध्ये हळदी कुंकू समारंभ; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील डी-मार्ट समोरील मैदानात युथ सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरा गणपती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 14) करण्यात आले होते. हा समारंभ युथ सोशल फाउंडेशन नवीन पनवेल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला परिसरातील …
Read More »‘सीकेटी’त आयकर रिटर्न ई-फायलिंग आणि कर व्यवस्थापनविषयक व्याख्यान
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे आयकर रिटर्न ई-फायलिंग आणि कर व्यवस्थापन याविषयावर अतिथी व्याख्यान बुधवारी (दि. 14) आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे सनदी लेखापाल कौस्तुभ मधुसूदन जोशी आणि पीएनबी मेटलाईफचे शाखा …
Read More »लागू बंधूतर्फे दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री
पनवेल : रामप्रहर वृत्त लागू बंधूतर्फे तज्ज्ञ मंडळींच्या कलानजरेतून साकारलेल्या मोती, हिरे आणि रत्नजडित दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री सोहळा लागू बंधूंनी 17 व 18 सप्टेंबरदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरुची हॉटेल, ओल्ड पनवेल येथे आयोजित केला आहे. प्रसिद्ध लागू बंधू मोतीवाले म्हणजे उत्तम आणि सुंदर दागिन्यांची शाश्वती. गेल्या आठ …
Read More »सीकेटी विद्यालयात विविध स्पर्धा; हिंदी दिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. प्रमुख अतिथी सीकेटी सिनिअर कॉलेजच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. गितिका तुनावर होत्या. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे (इंग्रजी प्राथमिक), पर्यवेक्षक मोरे सर, पर्यवेक्षिका पूर्व प्राथमिक संध्या अय्यर तसेच शिक्षक पालक संघाच्या सदस्य सौ. जाधव या …
Read More »रामशेठ ठाकूर विद्यालयात वादविवाद स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 14) हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी भाषेचे महत्त्व वाढावे म्हणून 1953पासून भारतभर 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला. …
Read More »