Breaking News

Monthly Archives: September 2022

भरपावसात गणरायाला निरोप..!

अलिबाग : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत लाडक्या गणपती बाप्पाला सर्वत्र भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी वरुणराजाने हजेरी लावली होती. तरीही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव जल्लोषात झाला. 10 दिवस गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. …

Read More »

राज्यातील शेतकर्‍यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून खुशखबर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्‍यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकर्‍यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली …

Read More »

‘लम्पी’चा प्रादूर्भाव रोखण्याकरिता सतर्कता बाळगावी

सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कोकरे यांचे पशुपालकांना आवाहन पाली : प्रतिनिधी गाई, म्हशीमध्ये होणार्‍या लम्पी स्कीन या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी, असे आवाहन सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी केले आहे. जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या …

Read More »

खालापुरातील जखमी पोलीस, होमगार्ड यांच्या मदतीसाठी दिलासा फाउंडेशनचा पुढाकार

खालापूर : प्रतिनिधी एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्तांना मदत करताना जखमी झालेले खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड यांच्या मदतीसाठी दिलासा फाउंडेशने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनने गुरुवारी (दि. 8) पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्याकडे पाच हजारांचा धनादेश सुपूर्द केला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 5 सप्टेंबर रोजी रात्री कारला अपघात झाला …

Read More »

वाडगाव येथील कुस्ती स्पर्धेत गावदेवी आंदोशी संघ विजेता

प्रथम क्रमांकाची मानाची गदा पारनेरच्या ॠषीकेश हांडे यांने पटकावली रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे हनुमान तालिम संघ व वाडगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत आंदोशी संघ विजेता ठरला, तर टाकादेवी मांडवा द्वितीय आणि जय हनुमान तालिम संघ-पनवेल तृतीय क्रमांकाचा मानकरी …

Read More »

माणगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; अनेक नद्यांना पूर

माणगाव : प्रतिनिधी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माणगाव तालुक्यात अनेक नद्यांना पूर आला असून,  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडू नये, म्हणून महसूल खात्याकडून दक्षता बाळगण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. माणगाव तालुक्यात 7 व 8 सप्टेंबर रोजी …

Read More »

द्रुतगती मार्गावर कंटेनरची कारला धडक; एक ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ गुरुवारी (दि. 8) दुपारी 3.45  वाजण्याच्या सुमारास कंटेनरने इर्टिगा कारला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. द्रुतगती मार्गावरून गुरुवारी दुपारी कंटेनर पुणे ते मुंबई असा जात होता. बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात विशेष अतिथी सत्र

पोपटराव पवार यांचे जलसंधारण व ग्रामीण विकास विषयक मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाचा वतीने गुरुवारी जलसंधारण आणि ग्रामीण विकास विषयक विशेष अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पद्मश्री, आदर्श ग्राम …

Read More »

भाजपच्या विजय भोईर यांचे कौतुक

तब्बल 55 वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी उरण : बातमीदार, प्रतिनिधी भाजपचे नवघर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी राजे शिवाजी मित्र मंडळ कोटनाका येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 55 वे रक्तदान केले. या अगोदर 54 ठिकाणी त्यांनी रक्तदान केले आहे. या त्यांच्या सामाजिक …

Read More »

‘शिव संकल्प’चा गणेशोत्सव उत्साहात

कामोठे : रामप्रहर वृत्त शिव संकल्प सोसायटी गणेश उत्सव मंडळ प्लॉट नंबर 20 सेक्टर 36 कामोठे येथील शिवसंकल्प सोसायटीतील रहिवाशांद्वारे कोरोना काळानंतरचा पहिला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सोसायटीतील स्त्री पुरुष आबालवृद्ध आणि लहान बालगोपाल मंडळी मोठ्या उत्साहाने बाप्पाच्या आरतीला एकत्रित येत असतात. सोसायटीतील लहान मुला मुलींच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी …

Read More »