आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर दिपावलीनिमित्त उरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षाप्रमाणे यंदा तेरापंथी हॉल वाणीआळी येथे दीपावली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदार महेश …
Read More »Monthly Archives: October 2022
करंजाडे आदिवासीवाडी लखलखली!
आमदार महेश बालदी यांच्या निधीतून दिवाबत्तीची सुविधा पनवेल ः रामप्रहर वृत्त उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि भाजपचे युवा नेते मंगेश शेलार यांच्या प्रयत्नांमुळे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली करंजाडे आदिवासीवाडीतील विजेची समस्या सुटली आहे. या वाडीमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. हे काम आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून …
Read More »दिवाळी संपताच बेकायदा फलकबाजीवर कारवाई
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात दोन वर्षे करोना काळातील संकटामुळे नियमांच्या चौकटीत दिवाळी साजरी करावी लागली, परंतु आता निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येत असताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना दुसरीकडे बेकायदा फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र पहायला मिळाले होते, …
Read More »तळोजातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा
पनवेल ः वार्ताहर फुटलेल्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने तळोजा सेक्टर 11मधील काही सोसायटीधारकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. ऐन दिवाळीतच हा प्रकार घडल्याने रोष व्यक्त केला जात आहे. तळोजा सेक्टर 11मधील गणेश मंदिर, जय शक्ती, सुमोध सोसायटीलगत असलेल्या रस्त्यावरील मलनिःसारण वाहिन्या भरून रस्त्यावर वाहत आहेत. अशातच या परिसरात दूषित …
Read More »अपुर्या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेकरांची होतेय गैरसोय
पनवेल ः वार्ताहर शहरापासून दूर आणि अपुर्या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेतील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे होईल, असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टपाल कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. कामोठेची लोकसंख्या तीन लाखांच्या घरात गेली आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. सेक्टर 5 येथे …
Read More »सुटीच्या दिवशी विभागनिहाय हरकती सूचना स्वीकाराव्यात
भाजपचे महामंत्री विजय घाटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी विकास आराखडा प्रकाशित केला आहे. या प्रक्रियेनुसार सूचना आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत ठेवली आहे. सध्या हरकती सूचना स्वीकारण्याचा कालावधी समाप्त होत आला आहे. शेवटचे दोन दिवस उरले आहेत, …
Read More »एपीएमसीच्या बाजार समित्यांचा होणार पुनर्विकास
संचालक मंडळाच्या हालाचाली सुरू; सल्लागारांची नियुक्ती नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून वाशीतील इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता 2005पासून धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या कांदा-बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याच्या निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने …
Read More »मुरूड किनारी सी-गल पक्षांचे आगमन
मुरूड : प्रतिनिधी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुरूडमध्ये सध्या सी-गल पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. या पक्ष्यांच्या आगमनाने समुद्रकिनार्यांचे सौंदर्य अधिकच खुलल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलिया येथून मोठे अंतर पार करून थंडीच्या दिवसांत सी-गल पक्षी दरवर्षी मुरूड समुद्रकिनारी येत असतात. हा एक समुद्री पक्षी असून ते थव्यामध्ये राहतात. या पक्षांचा रंग पांढरा असतो. …
Read More »मुंबई ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत
अलिबाग : प्रतिनिधी येत्या 1 नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानंतर मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. …
Read More »एक देश-एक पोलीस गणवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिसांच्या गणवेशावर भाष्य केले आहे. एक देश-एक पोलीस गणवेश या संकल्पनेवर राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 28) केले. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित …
Read More »