Breaking News

Monthly Archives: October 2022

दिवाळीतला काँग्रेसी किल्ला

लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवडून आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात रुजलेली हायकमांड संस्कृती कायमची संपवावी आणि अधिक सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची किमान अपेक्षा होती, परंतु पक्षाच्या सुकाणू समितीतील नावे पाहिली असता काँग्रेस पक्षात यापुढील काळातदेखील हायकमांडचेच वर्चस्व राहणार हेच स्पष्ट दिसते. गांधी घराण्याच्या पादुका अध्यक्ष पदाच्या खुर्चीत ठेवून …

Read More »

रायगडात घनकचरा व्यवस्थापन गरजेचे

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगात होत आहे. त्याचबरोबर नागरिकीकरणदेखील झापट्याने होत आहे. विशेषतः उत्तर रायगडात नागरिकरण वेगात होत आहे. त्यामुळे अनेक समस्यादेखील निर्माण होत आहेेत. औद्योगिकरणामुळे जल, वायू, ध्वनी प्रदुषण होतच आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाची समस्या जाणवू लागली आहे. घनकचर्‍याची समस्या ही रायगड जिल्ह्याची सर्वांत मोठी समस्या …

Read More »

मुरूडमध्ये पाच पाळीव जनावरांची कत्तल

पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात कत्तलखोरांचा पोबारा मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील गारंबी धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका झुडुपात गुरुवारी (दि. 27) पहाटे काही अज्ञात इसम पाच पाळीव जनावरांची कत्तल करीत असताना मुरूड पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते सर्व इसम एका इनोव्हा गाडीत पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी …

Read More »

माणगाव तालुक्यात हळदीची लागवड; अर्धा एकरात दहा टनाचे उद्दिष्ट

माणगाव : प्रतिनिधी लहरी पर्जन्यमानामुळे भातशेती धोक्यात आली असतानाच माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत केलेली जैविक हळदीची यशस्वी लागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे उत्पादन घेतले जाते, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी पावसामुळे भातशेती संकटात सापडत आहे. कापणीच्या हंगामात पाऊस …

Read More »

दिवाळी सुटीनिमित्त मुरूड जंजिर्‍याला पर्यटकांची पसंती

मुरूड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुटीमध्ये तालुक्यातील मुरूड, काशीद,  नांदगाव समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वीकेण्ड आणि दिवाळीची सलग पाच दिवस सुटी पडल्यापासून मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. मुरूड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारी मोठ्या …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पेणमध्ये आनंदाचा शिधा वाटप

पेण : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी चार शिधा जिन्नस मिळणार असून, त्याचा लाभ पात्र शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यातील बोरगाव येथे केले. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त …

Read More »

दिवाळी सुट्टीनिमित्त रायगडचे किनारे पर्यटकांनी बहरले

अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी सण संपला तरी शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुटी आहे. या सुटीचा आनंद घेण्यासाठी  पर्यटक मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले आहेत. पर्यटनासाठी  पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. त्यामुळे रायगडातील पर्यटनस्थळे तसेच सर्व समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बाग यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच …

Read More »

राज्यात थंडीची चाहूल

रात्री तापमानात झपाट्याने घट पुणे : प्रतिनिधी नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडयात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे. राज्यात पुढील आठवडाभर कोरड्या हवामानाची स्थिती राहणार …

Read More »

पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील महिन्यात पनवेल अर्बन बँकेची निवडणूक असून या निवडणुकीकरिता भरतीत जनता पक्षाच्या उमेदवारांनी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 27) आपले उमदेवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना …

Read More »

दिवाळी सणात आत्मीयता राहिली नाही!

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा सण. मुलांना फटाके फोडायचे असतात, किल्ला बनवायचा असतो मजा करायची असते. दिवाळीची सुटी असल्याने अनेकांचे फिरण्याचे बेत ठरलेले असतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटनाचे काहींनी बेत केलेले असतात तर कोणाला मामाच्या गावाला जायचे असते. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हवासा वाटणारा सण दिवाळी, पण आज त्यात आत्मीयता जाणवतच …

Read More »