Breaking News

Monthly Archives: November 2022

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पनवेलमध्ये दीपोत्सव

पनवेल : वार्ताहर श्री रामेश्वर महादेव देवस्थान व जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजता शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर,वीर सावरकर चौक पनवेल येथे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला …

Read More »

किल्ले स्पर्धेत राजे शिवराय प्रतिष्ठान प्रथम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन पनवेलच्या राजे शिवराय प्रतिष्ठानने …

Read More »

ताम्हिणी घाट व डोंगरमाथ्यावर धुक्याची दुलई

प्रवासी, पर्यटक सुखावले सुधागड : रामप्रहर वृत्त हिवाळा सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यात थंडी आणि धुके जाणवत आहे. डोंगरावर विशेषतः ताम्हिणी घाटात पांढर्‍या शुभ्र व करड्या रंगांचे ढग दाटत आहेत. जणू काही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखी बहारदार होतो. त्यामुळे येथून प्रवासी, …

Read More »

माणगावात जुगार अड्ड्यावर छापा; 39 जणांविरुद्ध गुन्हा

माणगाव : प्रतिनिधी माणगाव शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून 39 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून एक लाख 85 हजार 310 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. माणगाव शहरातील वक्रतुंड हॉटेलमध्ये काही लोक तीन पत्यावर पैसे लावून गैरकायदेशीररित्या जुगार खेळत होते. या ठिकाणी पोलिसांनी शनिवारी …

Read More »

बोरघाटात रिक्षा अपघातात दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात खोपोलीनजीक टाटा पॉवरच्या सायमाळ वसाहतीजवळील अवघड वळणावर एक रिक्षा समोरून येणार्‍या खाजगी बसवर धडकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा येथून किरण वाघमारे याच्या रिक्षेतून (एमएच 14-एचएम 5296) रेल्वेचे कर्मचारी शत्रुंजय त्रिपाठी, राघवेंद्र राठोड, …

Read More »

पनवेलमध्ये ‘रोटरी’च्या घनदाट जंगल प्रकल्पाचा शानदार प्रारंभ

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी घनदाट जंगल प्रकल्प उभारून वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी (दि. 6) शहरातील लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटलशेजारील नियोजित जागी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबोलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. पनवेल शहर व तालुका भाजप …

Read More »

खोपोलीत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार

34 जणांना अटक, 72 लाखांचा मुद्देमाल जप्त खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कोंबड्यांच्या पायाला धारदार हत्यार लावून त्यांची झुंज खेळवून चालणारा जुगार खोपोली पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला असून, याप्रकरणी 34 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून चार लाख 31 हजार 195 रुपये रोख रक्कम, 18 हजार 700 रुपयाची …

Read More »

पथविक्रेत्यांना जागा देण्याचे धोरण असताना त्यांच्यावरील कारवाई अयोग्य

माजी उपमहापौर सीताताई पाटील यांचा पालिका प्रशासनावर आक्षेप पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवले गेलेले नाही. त्याचबरोबर पथविक्रेत्यांना पर्यायी जागासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. असे असताना त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यावर माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. अगोदर पुनर्वसन आणि पर्यायी जागा …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून (दि. 5) पुणे येथील केंद्रातून प्राथमिक फेरीच्या उद्घाटनाने प्रारंभ झाला. रामकृष्ण मोरे …

Read More »