Breaking News

Monthly Archives: December 2022

सुषमा अंधारेंविरोधात श्रीवर्धनमध्ये निषेध रॅली

श्रीवर्धन ः प्रतिनिधी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवतांबद्दल तसेच संतांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात त्यांचा हिंदू एकता मंचातर्फे श्रीवर्धनमध्ये निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदनही पोलीस ठाण्यात देण्यात आले. या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी हातामध्ये टाळ, चिपळ्या, भगव्या पताका, …

Read More »

अंबा नदी होतेय दूषित

प्लास्टिक पिशव्यांसह निर्माल्याचा खच पाली ः प्रतिनिधी अंबा नदी सुधागडवासियांबरोबरच पालीकरांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. संपूर्ण पालीसह बाजूच्या गावांना अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो, मात्र सध्या या नदीला प्लास्टिकच्या पिशवीतून टाकलेल्या निर्माल्याच्या कचर्‍याने घेरले आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. घरात देवपुजेसाठी वापरलेली फुले, हार दुसर्‍या दिवशी शिळे होतात. …

Read More »

अमली पदार्थ तस्करीला आळा घालणार -भारंबे

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, सायबर तसेच अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. त्याशिवाय पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीवर भर देण्याचे …

Read More »

गोवर रूबेला लसीकरणाला वेग

नवी मुंबईमध्ये पहिल्या फेरीत 10,568 बालकांना डोस नवी मुंबई : बातमीदार नमुंमपा टास्क फोर्सच्या 30 नोव्हेंबर व 13 डिसेंबरच्या विशेष बैठकीत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नवीन उद्रेक सुरू झाल्यास नऊ महिने ते ते पाच वर्ष वयाच्या बालकांना गोवर रुबेलो लसीचा एक अतिरिक्त डोस तसेच सहा महिने …

Read More »

खोपोलीजवळ टँकर वेल्डिंगदरम्यान स्फोट; दोन जण गंभीर

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर रिकाम्या पेट्रोल टँकरला वेल्डिंग करीत असताना स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी 1.30च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे महामार्गावर हाळ गावच्या हद्दीत सागर हॉटेलसमोरील गॅरेजमध्ये एका रिकाम्या पेट्रोल टँकरचे (एमएच 49 बीएफ 7570) वेल्डिंग काम सुरू होते. या वेळी …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

नागपूर : प्रतिनिधी कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव मंगळवारी (दि. 27) महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या …

Read More »

अलिबाग शहापूर येथे उधाणाचा तडाखा

22 घरांसह 300 एकर शेतीला फटका अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील शहापूर येथे सोमवारी (दि. 26) पहाटे 3 वाजता उधाणाचे पाणी घरात शिरल्याची घटना घडली. यामुळे 22 घरांसह 300 एकर शेतीला या उधाणाचा तडाखा बसला. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शहापूर गावाला उधाणाच्या पाण्याने वेढा दिला. गाढ झोपेत असलेल्या गावकर्‍यांची यामुळे …

Read More »

आगरकोट किल्ल्याला गतवैभव मिळणार!

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून प्रवेशद्वाराची डागडुजी रेवदंडा : प्रतिनिधी केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पुढाकाराने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या (चौकोनी बुरूज) डागडुजीचे काम सुरू झाल्याने इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले. रेवदंडा आगरकोट किल्ला ढासळत असल्याने याकडे इतिहासप्रेमींनी अनेक वेळा केंद्रीय पुरातत्व खात्याचे लक्ष वेधले होते. अखेर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या …

Read More »

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलिसांची फौज तैनात

अलिबाग : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिउत्साही पर्यटकांवर, मद्यपान …

Read More »

कोणाच्या बापाची हिंमत?

सीमावासियांचा पुळका महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या आलेला दिसतो, पण महाविकास आघाडीचे हेच नेते चार महिन्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील सत्तेचे लोणी वाटून खाण्यात मश्गूल होते. त्यांच्याच काळात सीमावासियांसाठी असलेल्या योजना धडाधड बंद झाल्या, हे लोक विसरलेले नाहीत, तर शिंदे-फडणवीस सरकारने या योजना सत्तेवर येताच पुन्हा सुरू केल्या. कर्नाटकचा निषेध करणारा ठराव विधिमंडळात बहुदा …

Read More »