मान्यवरांची उपस्थिती; रूचिता लोंढे यांच्या कार्याचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील ताम्हणे बंगला ते शहा प्लाझापर्यंतच्या रस्त्यालगतच्या गटारांचे व संपूर्ण रस्त्याचे स्टँम्पकाँक्रीटीकरण झाले आहे. नागरिकांना होणार्या समस्यांची दखल घेऊन या कामांसाठी माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून हे काम मंजुर करून आणले होते. त्यानुसार या …
Read More »Yearly Archives: 2022
काँग्रेस ः बुडते जहाज
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दोन दिवसांपूर्वी प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून 48 तास उलटत नाही तोच गांधी घराण्याचे युवराज राहुलबाबांच्या नेतृत्वावर टीका करीत तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चाललंय …
Read More »ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून होणार खुला
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पुन्हा खुला होणार आहे. 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुरातत्त्व खाते व मेरीटाईम बोर्डामार्फत हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक पर्यटक …
Read More »खादी कपड्यांना प्राधान्य द्या – पंतप्रधान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी सण-उत्सवांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादने एकमेकांना भेट म्हणून द्या. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असू शकतात, पण त्यात तुम्ही खादीला स्थान दिल्यास व्होकल फॉर लोकल मोहिमेला गती मिळेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 28) केले. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. …
Read More »जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार - ना. रवींद्र चव्हाण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले राज्यातील सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने निश्चितपणे घेऊन जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 28) येथे केले. उरण भाजपतर्फे आयोजित सत्काराला ते उत्तर देत होते. राज्यात नवीन …
Read More »सामाजिक संस्थांकडून विविध रोपांचे वाटप
पर्यावरणाच्या निरोगी संतुलनासाठी उपक्रम नवी मुंबई : बातमीदार भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी, एनएसजी कमांडोज मुंबई आणि स्माइल्स फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम घेण्यात आला. नवी मुंबई, खारघर, खालापूर, महाड आणि अमरावती येथे 10 हजार रोपांची लागवड आणि वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी ग्रामस्थ, नागरिक आणि शाळकरी मुलांना …
Read More »उलवे येथे रायफल क्लबचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर उलवे येथील इंडियन मॉडेल स्कूल व सिध्दांत रायफल आणि पिस्तूल शुटिंग क्लब रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चालु केलेल्या रायफल क्लबचे उद्घाटन पोलीस उपायुक्त परिमंडल 2चे शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी उलवे विभागात हा उपक्रम सुरू केल्याबद्दल व शुटिंग रेंज स्कूलच्या मुलांसाठी …
Read More »रयत बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गव्हाण विद्यालयात प्रचार सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचा बहुमान प्राप्त झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांची अर्थवाहिनी असलेल्या रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून संस्थेच्या सर्व विभागात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये …
Read More »आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत कराटे क्लासेस
उरण : बातमीदार केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून उरण चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट (कराटे) या सारख्या खेळाचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मार्शल आर्ट (कराटे क्लासेस) शिकविण्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र …
Read More »भाजपतर्फे विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठांचा सन्मान
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथे भाजपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा झाला. यावेळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांची उपस्थिती लाभली. निरंत पाटील यांच्या संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रभाग क्रमांक 35 व भाजपाचे माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper