Breaking News

Yearly Archives: 2022

चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदी ; मुंबईची धुरा आशिष शेलारांकडे

मुंबई :  प्रतिनिधी भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांच्या जागी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आमदार आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने महापालिका …

Read More »

दमदार कामगिरीची चुणूक

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  म्हणजे एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुपटीने शेतकर्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी आताही विरोधक हा निर्णय फसवा असल्याचेच ओरडत आहेत याला काय म्हणायचे? याच विरोधकांनी त्यांचे तीन चाकी बिघाडी सरकार सत्तेवर असताना प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस केंद्र सरकारकडे बोट …

Read More »

जेएनपीए सेझ कॉन्क्लेव्हला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद

उरण : प्रतिनिधी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीएने भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने 10 ऑगस्ट 2022 रोजी सुरत येथे जेएनपीए सेझ इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 चे आयोजन केले होते. या कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचा उद्देश्य गुंतवणुकदारांना भविष्यातील विकास प्रकल्पांमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या बंदर-आधारित औद्योगिकीकरणाचा एक …

Read More »

धरमतरकडे निघालेले दोन बार्ज भरकटले

उरणच्या किनार्‍यावर सुरक्षित; कर्मचारी सुखरूप उरण : प्रतिनिधी मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनार्‍यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे …

Read More »

रायगडमध्ये आजपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

समुद्रकिनार्‍यावर 15 ऑगस्टला देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट रोजी अलिबाग समुद्रकिनार्‍यावर देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने होणार असल्याची …

Read More »

राष्ट्रध्वजासंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पनवेल महापालिकेकडून घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत पनवेलमधील पटेल पार्क व व्यंकट रेसिडेन्सी येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राहिवाश्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या वेळी राहिवाश्यांना राष्ट्रध्वजाविषयी माहिती देण्यात आली. घरोघरी तिरंगा हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस असून यासंदर्भातील …

Read More »

भाजप भटके विमुक्त महिला आघाडीतर्फे पोलिसांना राखी

कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली भटके विमुक्त प्रदेश अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार, भटके विमुक्त महिला प्रदेश अध्यक्ष डॉ. उज्वला हाके आणि कोकण विभाग संयोजिका डॉ. समीरा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त महिला आघाडी कामोठे मंडलच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. पोलीस …

Read More »

सीकेटी विद्यालयात संस्कृत दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त श्रावण पौर्णिमा हा दिवस संस्कृत दिन म्हणून विश्वभरात साजरा होतो. सीकेटी विद्यालयात इंग्रजी माध्यमात हा दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी (दि. 10) साजरा झाला. कार्यक्रमाची सुरूवात जिनल वालावलकर हिने मेधासूक्त पठणाने केली. यानंतर प्रमुख अतिथी मंजिरी फडके तसेच अर्चना ठाकूर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी …

Read More »

पनवेलमध्ये ‘घरोघरी तिरंगा’ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 11) भाजप प्रभाग क्रमांक 19 आणि सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने तिरंगा वाटप करण्यात आले. यानिमित्त माजी खासदार …

Read More »

टाळेबंदीच्या काळात आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांवरील खटले मागे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन पुणे : प्रतिनिधी टाळेबंदीच्या काळात साखळी आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांवर दाखल करण्यात आलेले खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. टाळेबंदीला विरोध म्हणून हवालदिल झालेल्या व्यापार्‍यांनी एप्रिल 2021मध्ये शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते. या दरम्यान सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नसतानादेखीलया …

Read More »