Breaking News

Yearly Archives: 2022

पनवेलमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या रायगड प्रिमीअर लीगच्या संकेतस्थळाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 4) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप …

Read More »

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सभागृह उभारणीसाठी निधी मिळावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी   पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथे सेक्टर 11 मधील भूखंड क्र. 6 या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणीसाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे. या …

Read More »

तैवानचा तिढा

तैवानवरून अमेरिकेने आशियातील आग्या माशांच्या मोहोळावरच दगड मारला आहे हे खरेच. त्याची झळ तैवानला लागेलच. परंतु चीनच्या अन्य शेजार्‍यांनाही त्याची किंमत कदाचित मोजावी लागू शकेल. वास्तविक सध्याचा काळ हा कोविडोत्तर पुनर्उभारणीचा काळ मानला जातो. आर्थिक प्रगतीची चिंता करण्याऐवजी युद्धाची खुमखुमी जिरवण्याचे हे उद्योग परिस्थिती चिघळवणारे ठरू शकतात. तैवानचा तिढा त्यामुळेच …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे बुधवारी (दि. 3) मशिन लर्निंग विथ पायथॉन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील …

Read More »

पनवेल मनपाचे घरोघरी तिरंगा जनजागृती अभियान

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत नागरिकांचे ऑनलाईन चर्चासत्र व एनएनएसच्या विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयाच्या एनएनएसच्या विद्यार्थ्यांना या अभियानात बुधवारी (दि. 3) सामील करून घेण्यात आले. उपायुक्त विठ्ठल डाके यांनी या अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या …

Read More »

भाजप राष्ट्रीय विचारधारा मानणारा पक्ष -चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रहीत विचारात घेऊन राजकारण करतो. मात्र विरोधी पक्ष विनाकारण भाजपला विरोध करतांना पक्षाची चुकीची प्रतिमा मांडतात.भाजप मुस्लिम विरोधी नसून राष्ट्रीय विचारधारा मानणारा पक्ष आहे, हे पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. …

Read More »

आमच्या संयमाचा अंत पाहू नका

गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा पुणे ः प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. 2) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सूचक इशाराच उदय …

Read More »

रोह्यात हळद लागवडीचा प्रयोग

50 शेतकर्‍यांकडून पारंपरिक पीकांना पर्याय रोहे ः प्रतिनिधी रोह्यात खरीप हंगामातील भात व नाचणीला पर्याय ठरू शकणार्‍या हळद लागवडीचा प्रयोग शेतकरी करीत आहेत. तालुक्यात या वर्षी 15 हेक्टरच्या आसपास हळद लागवड करण्यात येत आहे. रोहा तालुक्यात प्रामुख्याने भात व त्या खालोखाल नाचणी हे पिक घेतले जाते. अलिकडे तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : रायगड जिल्ह्यात पुतळे, स्मारकांवर फडकणार तिरंगा

नागोठणे ः प्रतिनिधी भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. या निमित्ताने रायगड जिल्ह्यात 13 पुतळे व स्मारकांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. त्यामुळे पुतळे आणि स्मारकांना नवी झळाळी प्राप्त होणार …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी (दि. 3) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या संदर्भात गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर ही सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल, असे सरन्यायाधीश रमणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमधील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हानासह अन्य याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. या वेळी …

Read More »