Breaking News

Yearly Archives: 2022

पनवेल रेल्वे पुलाची डागडुजी करण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील बसवण्यात आलेल्या लाद्या उखडल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवाशी पडण्याची शक्यता आहे. यामुळे या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. मध्य रेल्वेचे पनवेल रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन आहे. …

Read More »

पनवेल महापालिकेतर्फे योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी या वेळी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना योगासनाचे विविध प्रकार आणि प्राणायमसाठी मार्गदर्शन केले.  या वेळी सहाय्यक संचालक नगररचनाकार ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, कार्यकारी अभियंता …

Read More »

पत्रकार सय्यद अकबर यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांना पत्रकारिता समाजकारण आणी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जयहिंद फाउंडेशनकडून खारघर येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जयहिंद फाउंडेशनने सैनिक हो तुमच्यासाठी संकल्पना राबवून सीमेवर शहीद झालेल्या कुटुंबीयांना मदत करण्याची अनोखी मोहीम देशभरात …

Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

सीकेटी विद्यालयात विद्यार्थ्यांनी केली योगसाधना; शिक्षकांनी दिले प्रोत्साहन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी बालवयातच योगासनांची मुलांना सवय लागली तर त्यांचे जीवन सुदृढ आणि निरोगी बनेल, यात …

Read More »

नाईक महाविद्यालयात योग दिन

नवी मुंबई : बातमीदार कोपरखैरणे येथील नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या साह्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संदीप नाईक, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सहयोगी प्रा. डॉ. सविता बलकर आणि योग प्रशिक्षक संदीप शिकारे, रवींद्र पष्टे अणि दिलीप गोंधळी हे उपस्थित …

Read More »

पारसिक हिलवरील सौंदर्यस्थळ वाचण्यासाठी पर्यावरणवादी सरसावले

नवी मुंबई : बातमीदार बेलापूरमधील पारसिक हिलच्या रहिवासी बाजूला, रविवारी नवीन स्थळावर खानकामास सुरू झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असल्याचे मत पारसिक हिलचे निवासी विष्णू जोशी यांनी व्यक्त केले. याविषयी पर्यावरण वाद्यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. नॅट कनेक्शन फाउंडेशनने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगरकडे तक्रार केली असे …

Read More »

भाजपकडून सीवूड्समध्ये हायमास्टची सुविधा

नवी मुंबई : बातमीदार माजी नगरसेवक गणेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सीवूडस सेक्टर 44 आणि 46 येथे विविध ठिकाणी हायमास्ट दिवे बसवण्यात आले असून आता हे परिसर प्रकाशाने उजळून निघाले आहेत. सिस्ट 46 ए मध्ये गेहलोत मॅजेस्टिक सोसायटीसमोर आणि सेक्टर 44 ए केशवकुंज सोसायटीसमोर हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. या हायमास्टचे …

Read More »

शिरवणेत पोलीस गस्ती पथक वाढविण्याची भाजपची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार शिरवणे गाव, नेरूळ सेक्टर 1, जुईनगर परिसरातील वाढत्या चोरीच्या घटना, वाढत असलेले अनुचित प्रकार यामुळे नागरिकांमध्ये वाढलेली असुरक्षिता आदींबाबत नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांची माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी भेट घेतली. भाजप प्रभाग 32 मधील कार्यकर्त्यांसमवेत एक लेखी निवेदन देऊन पोलीस गस्त …

Read More »

हिवताप प्रतिरोधासाठी विशेष मोहीम

नवी मुंबईत पालिकेकडून डास उत्पत्ती स्थानांची तपासणी नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महापालिकेतर्फे जून  महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात आला असून सदर महिन्यामध्ये संवेदनशील कार्यक्षेत्रातील घरांतर्गत विशेष डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिम तसेच ताप रुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली.  या मोहिमे अंतर्गत माहे जून 2022 मध्ये …

Read More »

चांगल्या कामास कोलदांडा

अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी असे टुमणे काही विरोधीपक्षांनी लावले होते. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना ठरल्याप्रमाणेच सुरू होईल. त्यामध्ये आता कुठलाही बदल करण्यात येणार नाही असे लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सांगितले ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. एकंदरीत एका चांगल्या योजनेचे मातेरे करण्यासाठी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी …

Read More »