Breaking News

Yearly Archives: 2022

शिवजयंतीनिमित्त उलगडला शिवरायांच्या शिलेदारांचा जीवनपट

पनवेल भाजप युवा मोर्चाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने अध्यक्ष रोहित जगताप यांनी शिवरायांच्या शिलेदारांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा जीवनपट उलगडला. या शूरवीरांचे कार्यफलक शहरातील वडाळे तलाव परिसरातील रस्त्यावर लावून नागरिकांना माहिती देण्यात …

Read More »

एक सुडाचा प्रवास

आमचे हिंदुत्व म्हणजे सुडाचे राजकारण नव्हे अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष विरोधकांशी सुडाचे राजकारण करत असून हा सुडाचा प्रवास थांबवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनीच व्यक्त केली होती. तथापि, सुडाचे राजकारण नेमके कोण करते आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सोमवारी कळून चुकले असेल. सोमवारचा …

Read More »

पाली फाटा येथे गोदामाला भीषण आग

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली-पेण मार्गावरील पाली फाटा येथील प्लास्टिक साठवण गोदामाला रविवारी (दि. 20) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलांच्या जवानांनी पाच बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. हे गोदाम पालीफाटा येथील अरिहंत अर्शियाच्या समोर आहे. या आगीचे कारण समजू शकले नाही.

Read More »

ममदापूर गावात सिलिंडरचा स्फोट; घर जळून खाक

कर्जत : बातमीदार नेरळ जवळील ममदापूर गावातील वरच्या आळीमधील  एका घरात रविवारी (दि. 20) सायंकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात संपूर्ण घराचे नुकसान झाले. सुदैवाने  घरात असलेल्या सीताबाई रामा डांगरे या आजी थोडक्यात बचावल्या. ममदापूर गावात सीताबाई रामा डांगरे यांचे घर आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सीताबाई जेवण बनवत …

Read More »

पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अलिबाग : प्रतिनिधी नेरळ येथील पत्रकार अजय गायकवाड यांच्यावर  हल्ला करणार्‍याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने सोमवारी (दि. 21) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण करण्यात आले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेतली. आरोपीला ताब्यात घेतले आहे, त्याला न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाच्या …

Read More »

अमिना इलेव्हन आयपीपीएलचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त आयपीपीएल क्रिकेट स्पर्धेत अमिना इलेव्हन या संघाने विजेतेपद पटकाविले आहे. इंटर पनवेल क्रिकेट कमिटी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर इंटर पनवेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी …

Read More »

शिक्षक पतपेढीत आरटीजीएस, एनईएफटी सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी शिवजयंतीचे औचित्य साधत रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील मुख्यालयात शनिवारी आरटीजीएस आणि एनईएफटी  सुविधा सुरू करण्यात आल्या. याचा लाभ पतसंस्थेच्या सभासद ग्राहकांना होणार असून व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहे. एखाद्या सभासदाचा मुलगा, मुलगी शिक्षणासाठी परदेशी अथवा इतर ठिकाणी असेल किंवा सभासद व त्याचा …

Read More »

रोह्यात 85 जणांचे रक्तदान

रोहे : प्रतिनिधी रोहा-मुरुड क्षत्रिय मराठा समाज आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त वतीने येथील भाटे सार्वजनिक वाचनालयात रविवारी (दि. 20) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 85 जणांनी रक्तदान केले. क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष काशीनाथ सावंत, सेक्रेटरी संदिप सावंत,  सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष अप्पा देशमुख, मराठा समाज …

Read More »

यंदा मान्सून सामान्य राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था या वर्षीच्या मान्सून अंदाजाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सन 2022साठी प्राथमिक मान्सून अंदाज जारी केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार असून तो सरासरीच्या 97 ते …

Read More »

घोटाळेबाज शिशिर धारकर यांना पेण पालिकेबाबत बोलण्याचा अधिकार नाही

भाजप नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांचे प्रत्युत्तर पेण : प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी पेणमधील नागरिक आणि पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना देशोधडीला लावले आहे. त्यांना पेण पालिकेबाबत बोलण्याचा अधिकार नाही तसेच त्यांचे आमदार रविशेठ पाटील यांच्याबाबत बालिश आणि बेताल वक्तव्य भाजप कदापि सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देले जाईल, …

Read More »