कर्जत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील स्थिती कर्जत : प्रतिनिधी कर्जत उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी यांची कमतरता असल्याने जवळपास पाचशे मोजणी अर्ज गेले तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. फक्त दोन सर्व्हे कर्मचारी कर्जत कार्यालयात सध्या कार्यरत असून एकूण सात जागा रिक्त असल्याने मोजणी अर्जाचा …
Read More »Yearly Archives: 2022
वाढत्या उन्हाच्या काहिलीवर गारेगार ताडगोळ्यांना मागणी; उरणमध्ये अनेक ठिकाणी विक्री
उरण : वार्ताहर उरण तालुका हा निसर्गसंपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. मच्छि, विविध प्रकारची फळे यासाठी उरण तालुका प्रसिद्ध आहे. यासोबतच उरण तालुक्यातील ताडगोळे हेदेखील प्रसिद्ध आहेत. अत्यंत ताजे आणि चविष्ट ताडगोळे उरणमध्ये मिळतात. सध्या उरण शहरात अनेक शेतकरीविक्रेते हे ताजे ताडगोळे विकण्याकरीता अनेक ठिकाणी बसलेले असल्याचे दिसून येते. नुकतेच …
Read More »75 कोटी सूर्यनमस्कार संकल्पात उरण महाविद्यालयाचा सहभाग
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील क्रिडा विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त ‘75 कोटी सुर्यनमस्कार’ या संकल्पात विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात योगा प्रशिक्षक पुनम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार कसे करावे याविषयीचे तंत्र सांगितले व योगा व प्राणायामाचे धडे दिले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य …
Read More »जगदिश गायकवाड यांची तडीपारी रद्द करण्यात यावी; स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या महेश साळुंखेंची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदिश गायकवाड यांची तडीपारी रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केली आहे. जगदिश गायकवाड हे कोकणातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. दरवर्षी जगदिश …
Read More »ध्येयपूर्तीसाठी उत्तुंग भरारी घ्या; भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन; गव्हाण विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वृद्धिंगत करून इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी हव्या त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य तथा भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी केले. ‘रयत’च्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये …
Read More »राष्ट्रवादीत पक्षांतराच्या बातम्या चुकीच्या; रवींद्र इथापे यांचा खुलासा
नवी मुंबई : बातमीदार मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत असा खुलासा नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रवींद्र इथापे यांनी मंगळवारी (दि. 15) त्यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी …
Read More »प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांवर आज सुनावणी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022ची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे 1 ते 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार 3852 हरकती व सूचना पालिकेला प्राप्त …
Read More »‘कंपोस्ट पिट’ची सक्ती त्रासदायक; नवी मुंबईतील कचरा प्रकल्पामुळे नागरिक त्रस्त
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सोसायट्यांना कंपोस्ट पिट प्रकल्प पालिकेने उभारण्याची सक्ती केल्याने नागरिकांमधून संतापाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कंपोस्ट पिट प्रकल्पाबाबत पालिकेने सक्ती करू नये अशी लेखी मागणी भाजपाच्या युवती मोर्चाच्या अध्यक्ष सुहासिनी नायडू यांनी सोमवारी आयुक्तांकडे केली आहे. नेरूळ प्रभाग क्रमांक 31 मधील सेक्टर 4 येथील सर्व सोसायटी …
Read More »महेश खाडे यांना युवा शिक्षक पुरस्कार प्रदान
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक महेश खाडे यांना शैक्षणिक उपक्रमासाठी टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन सांगली आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंग्लिश रिडींग बाय फोनेटिक या विषयावरील उपक्रमाबद्दल त्यांचा सन्मान झाला आहे. महेश खाडे …
Read More »कोमसापच्या मुरूड-जंजिरा शाखाध्यक्षपदी संजय गुंजाळ
मुरूड ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद मुरूड-जंजिरा शाखेची सर्वसाधारण सभा नुकतीच नगर परिषद शाळा क्रमांक 4 येथील सभागृहात झाली. या सभेत 2021 ते 2024 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड ज्येष्ठ गायक डॉ. रवींद्र नामजोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यात शाखाध्यक्षपदी संजय गुंजाळ यांची निवड झाली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उषा खोत, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper