महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बिरवाडीमध्ये एक विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन तरुणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी मंगळवारी (दि. 15) आपल्या दोन मैत्रीनीं समवेत घरी जात असताना तीन तरुणांनी मोटारसायकल आडवी घालून त्यांना अश्लील भाषा केली. त्याबाबत पीडित तरुणीने केलेल्या …
Read More »Yearly Archives: 2022
सुधागडात ढोकशेत धरण क्षेत्रात अनधिकृत उत्खनन
महसूल विभागाने विकासकाला ठोठावला दोन कोटी 36 लाख रुपयांचा दंड; पाटबंधारे विभागाचीही नोटीस पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात एका खाजगी विकसकाने अनधिकृत उत्खनन व बांधकाम केले आहे. त्याचबरोबर धरणामध्ये भरावदेखील केला आहे. यासंदर्भात महसूल विभागाने विकासकाला दोन कोटी 36 लाख 64 हजार 620 रुपयांचा दंड ठोठावला आहे. …
Read More »शिमगा सुरू आहे
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जो शिमगा सुरू झाला आहे, तो इतक्यात तरी शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. खर्याखुर्या शिमग्याला अजुन थोडा अवकाश असला तरी राजकारणात मात्र शिमग्याला लाजवेल अशा भाषेत खेळ सुरू झाला आहे. राजकारणाची ही हीन पातळी महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिलेली …
Read More »पोलादपूर नगरपंचायत : भाजप आगामी काळात निर्णायक
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये पोलादपूरकरांना हवे असलेले परिवर्तन देण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अपयशी ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून आले तरीही शिवसेनेचे यश हे केवळ विभागलेल्या मतांमुळे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आघाडीतील एक मैत्रीपूर्ण लढत शिवसेनेला बढत देणारी ठरल्याने अंतिम निकालात शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसून आले. पहिल्या 13मध्ये शिवसेनेला सात आणि काँग्रेसला सहा …
Read More »पनवेलमध्ये आदिवासींना दाखले वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्वसानिमित्त शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार पनवेल तहसील कार्यालयामार्फत कातकरी उत्थान अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील कल्हे येथे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 16) आदिवासी नागरिकांना दाखले वाटप करण्यात आले. पनवेल तालुक्यातील कल्हे गावातील समाज मंदिरात झालेल्या …
Read More »खारघरमधील उद्यानाची डागडुजी; भाजप नेते प्रभाकर घरत यांचा पाठपुरावा
खारघर : रामप्रहर वृत्त भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या प्रयत्नाने खारघरमधील उद्यानाची डागडुजी व हॉलीबॉल खेळाचे मैदान तयार करण्यात आले आहे. येथील कै. भजनसम्राट महादेव बुवा घरत ज्येष्ठ नागरिक उद्यानात असणारे हिरवेगार गवत मुलांनी हॉलीबॉल व फुटबॉल खेळून खराब केल. त्यामुळे भाजप नेते प्रभाकर घरत यांनी यासंदर्भात सिडको व महापालिका …
Read More »महिलांना स्वयंरोजगारासाठी वस्तूंचे होणार उद्या वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 139व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वन्यजीव विभाग ठाणे, कर्नाळा पक्षी अभयारण्य अंतर्गत ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोणमार्फत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत शिरढोण व चिंचवण गावातील महिलांना स्वयंरोजगारसाठी शुक्रवारी (दि. 18) विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. महिलांना आत्मनिर्भर …
Read More »भाजपच्या दणक्याने अवैध मटण विक्रीला चाप
पनवेल : वार्ताहर महानगरपालिका हद्दीतील राजीव गांधी मैदान, आदई सर्कल, न्यू पनवेल येथे उघड्यावर प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करून अनधिकृत मटण विक्रीला चाप बसला आहे. बुधवारी (दि. 16) पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून येथील अनधिकृत चिकन-मटण विक्रेत्यांवर व बेकायदेशीर दुकानांवर कारवाई करण्यात आली. कत्तल केलेल्या प्राण्यांची घाण याठिकाणीच फेकून दिल्याने परिसरात दुर्गंधी …
Read More »भाजप नेते संजय घरत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष संजय घरत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 15) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना युनिवर्सल स्मार्ट कार्ड आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन …
Read More »विविध मागण्यांसाठी ओएनजीसी कर्मचार्यांचे प्रशासनाविरोधात उपोषण; आमदार महेश बालदी यांचा पाठिंबा
उरण : बातमीदार विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी, कामगारांच्या हिताचे असलेले सोयी सुविधा देण्यास टाळाटाळ करत असल्याबद्दल तसेच मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्ट यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास ओएनजीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी ऑइल फिल्ड एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे संघटनेकडून मंगळवार (दि. 15)पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper