Breaking News

Monthly Archives: March 2023

वृध्द महिलांचे सोने लांबविणारा ओलाचालक पोलिसांच्या ताब्यात

अडीज लाखे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त पनवेल : वार्ताहर वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून चैन जबरी चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास मुंब्रा पोलीसांनी अटक करून त्याच्या कडून 2,51,148 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंब्रा पोलीस ठाणे हददीतील दिवा शहर परिसरात वयोवृध्द महिलांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करून सदर महिला राहत्या इमारतीमध्ये जिन्याने …

Read More »

खांदा वसाहतीमध्ये सोनारावर चाकूहल्ला

 नागरिकांनी लुटारूला पकडले पनवेल : वार्ताहर दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोनारावर चाकूहल्ला करून दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास जागृत नागरिकांनी पकडल्याची घटना पनवेल जवळील खांदा वसाहतीमध्ये घडली आहे. सुखविंदर जसबीरसिंग धामी (वय 32) या लुटारुचे नाव असून मुकेश जैन यांचे खांदा कॉलनीत विजयश्री नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. …

Read More »

घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा बांधकाम व्यावसायिक ताब्यात

पनवेल, खारघर : वार्ताहर, प्रतिनिधी सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड या वादग्रस्त कंपनीचा संचालक शरद अमृत मोझर याला प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशाने थेट कारागृहात पाठविण्यात आले आहे. …

Read More »

शेतकर्‍यांचा लाँग मार्च अखेर स्थगित

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार आणि शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची चर्चा होऊन तोडगा निघाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येत असलेला किसान लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तशी माहितीही दिली आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करीत असल्याची माहिती शेतकरी …

Read More »

सर्वसमावेशक अर्थसंकल्पाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन अन् आभार!

मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्याचा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी पनवेल, उरणसह रायगड जिल्ह्याला पुढील काळात आवश्यक असलेल्या बाबींचा उल्लेख करीत तशी मागणीही या वेळी केली. …

Read More »

नेरूळचे वंडर्स पार्क लवकरच होणार सुरू

नवीन राइड्स, म्युझिकल लेझर शो नवीन प्रमुख आकर्षण नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी उद्यानांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईतील नेरूळस्थित वंडर्स पार्क हे थीम गार्डन शहरातील आणि शहराबाहेरील पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. मागील दोन वर्षे वंडर्स पार्कच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते ते आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. कामाच्या …

Read More »

नवी मुंबईवर सीसीटिव्हीची नजर

1500पैकी 702 सीसीटिव्ही कॅमेरे बसवले मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची आयुक्तांकडून पाहणी नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहर सुरक्षीततेला बळकटी देणार्‍या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास सुरुवात झालेली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई आणि अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासमवेत सीसीटीव्ही प्रणाली मुख्य नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करीत …

Read More »

ई-रिक्षा पूर्ववत सुरू करा!

माथेरान बंद, अधीक्षक कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा कर्जत ः प्रतिनिधी ई-रिक्षा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी शुक्रवारी (दि. 17) माथेरान बंद ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे नागरिकांनी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला. या वेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. माथेरानमध्ये तीन महिन्यांच्या पायलेट प्रोजेक्टनंतर ई-रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ई-रिक्षासेवा पूर्ववत सुरू …

Read More »

उरण मतदारसंघासाठी 147.50 कोटी रुपये मंजूर

आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार निधी पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 147.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रामुख्याने हा निधी रस्त्यांच्या विकासासाठी आहे. यामध्ये ग्रामीण मार्गाकरिता 47.50 कोटी, प्रमुख जिल्हा मार्गासाठी 58 कोटी, कोन-सावळे रस्त्याच्या उर्वरित कामासाठी 20 कोटी …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकला कारची धडक बसल्याने तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ शुक्रवारी (दि. 17) सकाळी हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (एमएच 04 जेएम 5349) एक्स्प्रेस वेवर उर्से गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला (आरजे 09 जीबी 3638) …

Read More »