Breaking News

Monthly Archives: March 2023

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच नाझनीन खलील पटेल भाजपमध्ये

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नाझनीन खलील पटेल व इरफान मुल्ला यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. उरण येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी (दि. 3) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या …

Read More »

जलतरणपटू प्रभात कोळीचा भीमपराक्रम

न्यूझीलंडची कूक स्ट्राईट खाडी पोहून केली पार सात आव्हाने पूर्ण करणारा ठरला सर्वांत युवा स्विमर पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याने खडतर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सातवे आव्हान न्यूझीलंड येथील कूक स्ट्राईट खाडी नुकतीच पोहून पार केली. सात समुद्रांचे आव्हान पूर्ण करणार्‍या …

Read More »

रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांना रविवारी डि.लिट पदवी होणार प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगडभूषण निरूपणकार डॉ. सचिन धर्माधिकारी यांना राजस्थानमधील जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाच्या वतीने मानाची डि.लिट पदवी जाहीर करण्यात आली असून रविवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात पदवी देऊन धर्माधिकारी …

Read More »

उरणकरांना रविवारीही होणार पाणीपुरवठा

आमदारांची पालकमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक उरण : वार्ताहर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रानसई धरणातून उरण शहराकरिता दर रविवारी पाणीपुरवठा सुरू ठेवण्याबाबत  रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री  उदय सामंत यांच्यासमवेत शुक्रवार (दि. 3) सकारात्मक बैठक झाली. या बैठकीस भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका …

Read More »

पोलारिस कंपनीसमोर कामगारांचे गेटबंद आंदोलन

लेखी आश्वासनाशिवाय मागे न हटण्याचा कामगारांचा निर्धार उरण : प्रतिनिधी भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सीडब्लूसी) कंपनीविरोधात स्थानिक भूमिपुत्र असलेल्या व ज्यांच्या जमिनी या कंपनीसाठी संपादित झाल्या अशा बेरोजगार युवकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 27 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. साखळी उपोषण सुरू असूनही कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी …

Read More »

उरण-खारकोपर रेल्वेमार्गाचे काम वेगात

शनिवारी आयुक्तांकडून होणार सुरक्षा तपासणी उरण ः प्रतिनिधी मागील 27 वर्षे प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित खारकोपर ते उरण हा लोकलचा रेल्वेमार्गाचा प्रकल्प मार्च अखेरपर्यंत सुरू करण्यासाठी सिडको व मध्यरेल्वे प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी शनिवारी (दि. 4) व सोमवारी (दि. 6)रेल्वेसुरक्षा आयुक्त या मार्गाची पाहणी करणार आहेत. या मार्गावरील उरण, …

Read More »

वडघर गावातील विकासाचा वेग वाढला

भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांच्या विकासनिधीतून रस्त्याचे भूमिपूजन उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्याला आमदार महेश बालदी यांच्यासारखे नेतृत्व मिळाल्यामुळे आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले. वडघर गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार …

Read More »

स्वच्छतेत सुधारणेसाठी गतिमान कामे करा

नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर यांचे अधिकार्‍यांना निर्देश नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहराची प्रतिमा नागरिकांच्या मनात स्वच्छ शहर म्हणून ठसलेली असल्याने शहर स्वच्छतेबाबत आणखी सुधारणांची अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने क्षेत्रीय कर्मचार्‍यांपासून ज्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी आहे, अशा नोडल अधिकार्‍यांपर्यंत सर्वांनी आपण करीत असलेले काम अधिक …

Read More »

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी 995 कोटींचा निधी मंजूर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने 995 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात धूपप्रतिबंधक बंधारे, बहुउद्देशीय निवारा केंद्र, भूमिगत विद्युत वाहिन्या, दरडप्रवण क्षेत्रातील उपाययोजना यासारख्या कामांचा समावेश आहे. कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्याच्या वतीने राज्य सरकारकडे एक हजार 894 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात …

Read More »

चाकूचा धाक दाखवून पादचार्‍यास लुटले

त्रिकुट गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई पनवेल ः वार्ताहर  एका पादचारी व्यक्तीला तीन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून नऊ हजार 600 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना पनवेल शहर परिसरात घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन आरोपींना अवघ्या एका तासात अटक केली आहे.  फिर्यादी बजरंग पवार (वय 22) …

Read More »