Breaking News

Monthly Archives: June 2023

पनवेल महापालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन, बोहरी समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन आणि बोहरी समाजाच्या दफनभूमीचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. याबाबत तिन्ही समाजांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी (दि. 26) आयुक्त गणेश देशमुख यांच्या दालनात झाली. या वेळी आयुक्तांनी …

Read More »

उरणमध्ये भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता मेळावा

उरण : वार्ताहर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याणकारी सरकारला 30 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशभर मोदी ऽ 9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि हितगुज कार्यक्रमाचे आयोजन उरण विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 26) करण्यात आले होते. या मेळाव्यात मोदी सरकारने …

Read More »

नवनाथ नगर, मालधक्का झोपडपट्टीमध्ये तात्पुरते नळ कनेक्शन देण्याची मागणी

अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांचे आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील नवनाथ नगर आणि मालधक्का झोपडपट्टीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात घरगुती नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. अ‍ॅड. वाघमारे यांनी निवेदनात …

Read More »

महाजनसंपर्क अभियानांतर्गत भाजप वैद्यकीय प्रकोष्ठची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत रायगड उत्तर जिल्हा वैद्यकीय प्रकोष्ठच्या वतीने प्रवास योजना अंतर्गत रविवारी येथे बैठक झाली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक डॉ. योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक …

Read More »

कामोठ्यातील न्यू इंग्लिश स्कूलला ‘दिबां’चे नाव

कामोठे : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि. बा .पाटील साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे असे करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी मार्फत न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाचे नाव बदलण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाला …

Read More »

खोपोली सुभाष नगरातील नागरी समस्या सोडविण्याची भाजपची मागणी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली प्रभाग नंबर 1 सुभाषनगर येथील विविध नागरी समस्यांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन दिले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. खोपोली सुभाष नगर येथील मस्को स्टील रेल्वेगेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करून या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत जुनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीतील परीक्षेत दिमाखदार यश मिळविले आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. …

Read More »

मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट

खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर विशेष मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येते आहे. त्यानुसार उत्तर रायगड भाजपच्या वतीने या अभियानांतर्गत समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींचा (सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट) शनिवारी (दि. 24) मेळावा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. खारघर …

Read More »

काँग्रेसच्या सत्ताकाळात घोटाळे; मोदी सरकार पारदर्शक -केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

उरण ः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर तब्बल 62 वर्षे देशात काँग्रेसने सत्ता भोगली, मात्र त्यांना देशाचा जनतेला अपेक्षित विकास करता आला नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात आठवड्यास एक घोटाळा उघडकीस येत होता. या उलट परिस्थिती मोदी सरकारची आहे. हे सरकार लोकाभिमुख व पारदर्शक असून मागील नऊ वर्षांच्या सत्ताकाळात एकही घोटाळा झाला नाही, असे प्रतिपादन …

Read More »

मोटरसायकल रिक्षाच्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जखमी

पनवेल : वार्ताहर भरधाव वेगात असलेल्या केटीएम मोटरसायकलची रिक्षासोबत झालेल्या धडकेमध्ये मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. केटीएम मोटरसायकलवरील आकाश मोहिते याने त्याच्या ताब्यातील केटीएम मोटरसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून रात्री 1 च्या सुमारास अमरधान स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर पनवेलकडून कळंबोलीकडे जाणार्‍या …

Read More »