राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत पाणी शिरून जीवित तसेच वित्त हानी झाली. नैसर्गिक संकट कुणाला रोखता व टाळता येत नाही, पण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवून शासन-प्रशासनाने वेळोवेळी नागरिकांना सतर्क केले. त्याचप्रमाणे आवश्यक ती मदत देऊन दिलासाही दिला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील फरक …
Read More »राजस्थानात लाल वादळ
राजस्थानातील संशयास्पद ‘लाल डायरी’मध्ये नेमके काय आहे हे यथावकाश चौकशीअंती बाहेर येईलही, परंतु ही रोजनिशी तेथील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयपथावर घेऊन जाणार यात शंका नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्या भाषणात राजस्थानातील प्रचार भ्रष्टाचारविरोधी अभियानाच्या अंगाने जाणार हे सूचित केले आहे. अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राजस्थानातील निवडणुकीच्या …
Read More »अतिवृष्टीने हाहाकार
गेल्या काही दिवसांपासून पडणार्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात दाणादाण उडाली आहे. सततच्या पावसाने चांदा ते बांदा हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला, तर राज्यात विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. जून महिन्यात ‘येरे येरे पावसा’ म्हणणार्या लोकांवर …
Read More »दुर्दैवाची दरड
दर पावसाळ्यात इर्शाळवाडीसारख्या शोकांतिका घडल्यानंतर बचावयंत्रणा धावून येते. त्यांच्या पाठोपाठ माध्यमांचे कॅमेरे जातात. चार दिवस हळहळ व्यक्त होते. राजकीय नेत्यांचा दुर्घटनास्थळावरील वावर कमी झाला की माध्यमांचे कॅमेरे अदृश्य होतात आणि पुनर्वसनाचे कार्य बंद पडते. हे सारे थांबायला हवे असाच इशारा इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने दिला आहे. पावसाळा ऐनभरात आला की रायगड जिल्ह्यामध्ये …
Read More »पंतप्रधान मोदींचा डंका
इच्छाशक्ती आणि त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असेल तर काय करता येते हे भारताचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. आधी अमेरिका आणि इजिप्त आणि त्यानंतर फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती (यूएई) असे दौरा करून पंतप्रधान मोदींनी भारताच्या पदरात खूप काही पाडून घेतले आहे. या दौर्यांचे फलित येत्या …
Read More »अग्निपरीक्षेत उत्तीर्ण
तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये खातेवाटप कसे साधायचे हा खरोखरच कळीचा मुद्दा होता, परंतु अशा तारेवरच्या कसरतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहीर आहेत. या अग्निपरीक्षेतदेखील ते पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत असेच म्हणावे लागेल. जनतेच्या माथ्यावर मारण्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले त्याला वर्ष उलटून गेले. या वर्षभराच्या काळात महाराष्ट्राचा कारभार …
Read More »रखडलेल्या नियुक्त्या
सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती आता उठवण्यात आली असून या संबंधातील एका याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेतील या नियुक्त्या लवकरात लवकर होतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा रखडलेला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या हस्तक्षेपामुळे आता मार्गी लागणार आहे. केवळ कुरघोडीच्या …
Read More »हिंसाचाराचा शाप
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांतील हिंसाचारात 18 जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मृतांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असून भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची रास्त मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पंचायत निवडणुकांसाठीचे मतदान झाले. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच या राज्यात हिंसाचाराला सुरुवात झाली होती. रविवारी हिंसाचारातील …
Read More »महाविकास आघाडीला धक्के
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोर्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सहकारी राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे समर्थक नाराज होऊन ठाकरे गटात परततील अशी अटकळ बांधली जात असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच घडत आहे. यानिमित्ताने ठाकरे गटासह …
Read More »लोकांचे सहकार्य हवे
भारतात रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण इतके प्रचंड का आहे, या प्रश्नाचे अर्धेअधिक उत्तर देशातील अलीकडच्या तीन मोठ्या रस्तेअपघातांच्या तपशीलांत मिळून जाते. काहीही घडले की सरकारकडे बोट दाखवायचे हा विरोधीपक्षांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे, परंतु एकीकडे देशातील महामार्गांचे जाळे कैकपटींनी विस्तारत असताना अपघातांचे प्रमाण आटोक्यात येत नसेल तर या अपघातांच्या तपशीलांत जाऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper