शिवसेना पक्षात उठाव होऊन महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार आणि सहकारी नेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचा शपथविधीही झाला. त्यामुळे राज्यात आणखी वेगळी समीकरणे उदयास आली आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते …
Read More »प्रगल्भतेसाठी प्रयत्न हवेत
एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तम कारकीर्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या दर्शना पवारची हत्या महाराष्ट्राला हादरवून गेली असतानाच मंगळवारी पुण्यात आणखी एका तरुणीवर संतप्त तरुणाने कोयत्याने हल्ला करण्याची घटना धक्कादायकच आहे. परंतु या वैयक्तिक स्वरुपाच्या घटनांचे विरोधकांनी राजकारण न करता, त्यामागील सामाजिक-मानसिक कारणांची गंभीर चर्चा यानिमित्ताने होण्याची गरज आहे. एमपीएससीची परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण …
Read More »केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच!
पावसाची चाहूल लागली की बेडकांची डराव डराव ऐकू येऊ लागते. काही बेडक्या अकारण फुगतात. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज दिसतेच आहे. जनमताचा धडधडीत अपमान करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कट्टर विरोधक राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली. केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जनमत लाथाडण्याचे पाप …
Read More »धमक्यांचे राजकारण
शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीकडे पाहता पोकळ धमक्यांना ते भीक घालणार नाहीत हे उघड दिसते. तथापि, राज्य सरकारने मात्र धमकीचा हा प्रकार गांभीर्याने घेतला असून शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. धमकी पोकळ असो किंवा कशीही त्याची दखल घेणे हे राज्य सरकारचे कर्तव्यच आहे. गेल्या वर्षभरामध्ये राजकारणाचा स्तर …
Read More »हिंसाचारामागे कोण?
समाजमाध्यमे कशाप्रकारे माथी भडकवू शकतात याचे प्रत्यंतर गेले दोन-तीन महिने महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा येत आहे. जाणून-बुजून राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, का असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील ताज्या हिंसाचारानंतर उपस्थित केला आहे, तो रास्तच म्हणावा लागेल. कोल्हापुरात मंगळवारी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतानाच काही …
Read More »शेजारधर्माचे नवे पर्व
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल नुकतेच चार दिवसांच्या भारत दौर्यावर येऊन गेले. त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली चर्चा, काही प्रकल्पांबाबत उभय देशांमध्ये झालेली सहमती आणि काही व्यापार करार ही द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने टाकण्यात आलेली स्वागतार्ह पावले आहेत. अलीकडच्या काळात काहिसा वाढलेला नेपाळचा चीनधार्जिणेपणा लक्षात घेता त्या …
Read More »गुलाबी नोटेचा संदेश
रिझर्व्ह बँकेने गुलाबी रंगाच्या २ हजाराच्या नोटा परत घेण्याच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे, त्यामुळे देशभर काहिसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तर असा संभ्रम निर्माण होण्याजोगे काहीच घडलेले नाही. परंतु विरोधकांना पराचा कावळा करण्याची जणु सवयच जडून गेली आहे. त्याचे दुष्परिणाम संभ्रमाच्या रूपात सर्वांना अनुभवावे लागत आहेत. …
Read More »बारसूच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे नेते रामदास कदम, संजय शिरसाठ, भाजपचे आमदार नितेश राणे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूचे मैदान आरोप प्रत्यारोपांनी गाजवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प त्यांनीच आणला आणि बारसू हे ठिकाणदेखील त्यांनीच सुचवले. असे असताना या प्रकल्पाला …
Read More »विरोधकांचे स्वप्नरंजन
गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ या नव्या प्रयोगाने ढवळून निघाले आहे. अर्थात या नव्या नाट्यप्रयोगामध्ये नवीन असे काही नाही. किंवा, त्या नाट्यकल्पनेला वास्तवाचादेखील काही आधार नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी आपले मनोरंजन तेवढे करून घेतले असेल. गेले काही दिवस महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लाभणार अशी आवई विरोधकांकडून उठवली जात होती. …
Read More »दुतोंडीपणाचा कळस
कोकणातील नाणार येथे उभ्या राहू पाहणार्या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध होता. नाणार येथील प्रकल्प हाणून पाडल्यानंतर कोकणातील बारसू येथील जागा ठाकरे सरकारनेच केंद्र सरकारला सुचवली होती. आता पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसणे नशिबी आल्यानंतर नियोजित बारसू प्रकल्पाला देखील विरोध करण्याचे पाप ठाकरे गट करू लागला आहे. याला दुतोंडीपणाचा कळस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper