राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडत आहेत. वाद झाले की पुन्हा जुळवून घेतले जाते. आता पुन्हा एकदा वाद सुरू झाले आहेत. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पालकमंत्री हस्तक्षेप करत असल्याचा थेट आरोप करून पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटविण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार …
Read More »शिमगा सुरू आहे
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जो शिमगा सुरू झाला आहे, तो इतक्यात तरी शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. खर्याखुर्या शिमग्याला अजुन थोडा अवकाश असला तरी राजकारणात मात्र शिमग्याला लाजवेल अशा भाषेत खेळ सुरू झाला आहे. राजकारणाची ही हीन पातळी महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिलेली …
Read More »पोलादपूर नगरपंचायत : भाजप आगामी काळात निर्णायक
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये पोलादपूरकरांना हवे असलेले परिवर्तन देण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अपयशी ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून आले तरीही शिवसेनेचे यश हे केवळ विभागलेल्या मतांमुळे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आघाडीतील एक मैत्रीपूर्ण लढत शिवसेनेला बढत देणारी ठरल्याने अंतिम निकालात शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसून आले. पहिल्या 13मध्ये शिवसेनेला सात आणि काँग्रेसला सहा …
Read More »फुसका बार
शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी मोठ्या वाजतगाजत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा फुसका बार महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर जनतेमध्येही विनोदाचा विषय ठरला आहे. दोन दिवसांपासून ही तथाकथित पत्रकार परिषद माध्यमांमधून गाजवली जात होती. प्रत्यक्षात मात्र अर्वाच्च्य शिव्याशाप आणि कंठाळी डायलॉगबाजी यांच्या पलीकडे या पत्रकार परिषदेतून काहीही हाती लागले …
Read More »नौटंकीचे राजकारण
भ्रष्टाचाराच्या नव्या आरोपांनी घायाळ झालेले महाविकास आघाडीचे नेते आक्रमक प्रत्युत्तराच्या नादात दिवसेंदिवस आणखी गाळात रुतत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या धमक्या असोत किंवा नाना पटोले यांची नौटंकी या दोहोंचा भाजपवर परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी महाविकास आघाडीची विश्वासार्हता मात्र दिवसेंदिवस धुळीला मिळत चालली आहे. कोविड केंद्रातील …
Read More »आयपीएलची श्रीमंती
सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखल्या जाणार्या इंडियन प्रीमियर लीगची श्रीमंती पुन्हा एकदा जगभरातील तमाम क्रीडारसिकांना अनुभवयाला मिळाली. आयपीएलचा मेगा ऑक्शन दोन दिवस रंगला आणि त्यात अनेक खेळाडू मालामाल झाले. यंदाच्या या लिलावाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रँचायझींनी देशी खेळाडूंना पसंती दर्शविली आहे. कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर असताना सर्वकाही सुरळीत होत …
Read More »स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा!
कर्जत नगर परिषदेने यंदा स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियानासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात थ्री स्टार मानांकन मिळविणार्या कर्जत पालिका प्रशासनाने आता 2022च्या अभियानाची तयारी सुरू केली आहे. सन 2019मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाली. त्या वेळी पहिल्याच वर्षी कर्जत नगर परिषदेला दोन लाखांचे …
Read More »भ्रष्टाचाराची माळ
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संशयाच्या घेर्यामध्ये अडकले आहेत. भ्रष्ट कारभाराच्या या माळेतील ताजे रत्न म्हणून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घ्यावे लागेल. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीची लपवाछपवी केल्यासंबंधीच्या एका जुन्या खटल्यामध्ये न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पंचवीस हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला …
Read More »वाघ, सिंह आणि गिधाडे
शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भारतीय जनता पक्षावर यथेच्छ तोंडसुख घेतले. सध्या गोव्याच्या निवडणुकीत प्रभारी या नात्याने गुंतलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील त्यांनी अकारण टीकेची झोड उठवली. राऊत यांच्या आप्तेष्टांची सध्या ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यातून काही भानगडी बाहेर येण्याची शक्यता आहे …
Read More »काँग्रेसची कृष्णकृत्ये
गेल्या आठ वर्षांपासून काँग्रेसची निरंतर पडझड सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. किमान माध्यमांमधून तरी तसेच चित्रण वारंवार होते, परंतु ही पडझड गेल्या आठ वर्षांपासून नव्हे, तर तीन-चार दशकांपासूनच सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत भाषण करताना गेल्या काही दशकांतील काँग्रेसच्या कृष्णकृत्यांचा जो पाढा वाचला, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper