नवी दिल्ली ः पुलवामा येथील दलीपोरात सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवामात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुलवामातील दलीपोरा भागात काही दहशतवादी …
Read More »मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीला पाकमध्ये अटक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा प्रमुख आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वाँटेड अब्दुल रेहमान मक्की याला पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरावालामधून अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने जमात-उल-दावा, फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशन आणि जैश-ए-मोहम्मदशी निगडित 11 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मक्की …
Read More »अत्याधुनिक क्षेपणास्त्र निर्यातीसाठी भारत सुसज्ज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारपासून (दि.14) सिंगापूरमध्ये तीन दिवसीय ‘आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना’ची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनादरम्यान बोलताना भारताने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचची निर्यात करण्यास तयार असून, यासाठी सरकारची आवश्यक मंजुरी मिळणे बाकी असल्याची माहिती ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’चे मुख्य …
Read More »वारजेत टँकर उलटला
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल-डिझेल वाया गेले. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर …
Read More »बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स
नागपूर ः प्रतिनिधी कर्मचार्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला आहे. निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-2016पासून दर महिन्याला 5,336 रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे …
Read More »नाशिक येथे रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला
नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोलपंपासमोर …
Read More »ठाण्यात कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू
कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यात घोडबंदर रोड येथे ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काल पहाटे सव्वासहा वाजता घोडबंदर …
Read More »प. बंगालमध्ये निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था निवडणुकांदरम्यान गोंधळ घालणार्या लोकांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात 107 कलमाचा वापर केला जातो, मात्र पश्चिम बंगालमध्ये असे होताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग देशात एक आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी अशी दुटप्पी भूमिका कसे घेऊ शकते, असा सवाल करताना यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, …
Read More »कांचनजुंगा मोहीम फत्ते
‘गिरीप्रेमी’ने रचला इतिहास पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील 10 गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करीत तिरंगा फडकावला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील 10 जणांच्या संघाने काल सकाळी दहाच्या सुमारास ही अभिमानास्पद कामगिरी केली. आठ हजार 586 मीटर उंच असलेले माऊंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे, …
Read More »‘पेटीएम’मध्ये कॅशबॅकच्या नावाखाली 10 कोटींचा घोटाळा
फसवणूक करणार्या कर्मचार्यांचे निलंबन नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नोटाबंदीनंतर पेटीएम ही कंपनी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेटीएम कंपनी चर्चेत आली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून पेटीएमममध्ये 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. खुद्द कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. पेटीएममध्ये हा फसवणुकीचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper