Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

कृषी विधेयकांवरून शेतकर्‍यांची दिशाभूल : मोदी

पाटणा : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून विरोधक खोटा प्रचार करीत आहेत, मात्र शेतकर्‍यांनी आपली दिशाभूल होऊ देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहारमध्ये रेल्वेपुलासह योजनांचे लोकार्पण केल्यानंतर रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी कृषी विधेयकांबद्दल शेतकर्‍याचे …

Read More »

राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार

मानवाधिकार उल्लंघनप्रकरणी आयोगाकडे तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकंगना रानौत प्रकरण व माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपने राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. याबाबत भाजप शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या …

Read More »

सहकारी बँकांवर आरबीआयचा अंकुश

लोकसभेत विधेयक मंजूर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्याचे विधेयक नुकतेच लोकसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे सहकारी बँका आता आरबीआयच्या नियंत्रणाखाली आल्या असून त्यांच्या व्यवहारांवर आरबीआयचा अंकुश असणार आहे. सहकारी बँकांना आरबीअययायच्या चौकटीत आणण्यासाठी बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करणार्‍या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन …

Read More »

रशिया भारताला देणार कोरोना लस

मॉस्को : वृत्तसंस्थाकोरोनावरील पहिली लस रशियाने तयार केली असून, या ’स्पुटनिक व्ही’ नामक लसीचे 10 कोटी डोस रशिया  जुना व चांगला मित्र भारताला देणार आहे. या संदर्भात भारतातील मोठ्या औषधी कंपन्यांसोबत चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read More »

अवघा देश वीर जवानांसोबत उभा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख …

Read More »

17 खासदारांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सोमवार (दि. 14)पासून प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यातच कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये भाजपचे 12, वायएसआर काँग्रेसचे दोन आणि शिवसेना, डीएमके व आरएलपीच्या प्रत्येकी …

Read More »

आजपासून संसदेचे अधिवेशन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेच्या अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून, खासदारांना डिजिटल पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयके सादर करणार आहे. त्यापैकी 11 अध्यादेश आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश …

Read More »

आता अयोध्येत उद्धव ठाकरेंचे स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार

विश्व हिंदू परिषदेची घोषणा अयोध्या : वृत्तसंस्थामुंबई महापालिकेकडून बांधकाम अवैध ठरवून अभिनेत्री कंगना रानौत हिचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. आता विश्व हिंदू परिषदेने यापुढे उद्धव ठाकरेंचे अयोध्येत स्वागत होणार नाही तर तीव्र विरोध केला जाईल, अशी घोषणा केली आहे. ’उद्धव ठाकरे …

Read More »

देशात कोरोना रुग्णांचा विक्रम

24 तासांत आढळले 96 हजारांहून अधिक रुग्ण नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देश नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. शुक्रवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशात 96 हजार 457 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1357 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

नवे शैक्षणिक धोरण भारताला नवी दिशा देणारे : मोदी

नवी दिल्ली  : वृत्तसंस्थानवे शैक्षणिक धोरण 21व्या शतकातील भारताला नवी दिशा देणारे ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षण या विषयावरील एका संमेलनात ते सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण हे …

Read More »