जॉयनगर ः वृत्तसंस्था बंगालमध्ये कुणीही जय श्रीराम म्हणायचे नाही, अशी सक्त ताकीद ममता बॅनर्जी यांनी दिली आहे, मात्र मी जय श्रीराम म्हणणारच. हिंमत असेल तर ममतादीदींनी मला अटक करून दाखवावी, असे थेट आव्हानच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना दिले आहे. अमित शहा यांच्या सभेला जावेदपूर या ठिकाणी …
Read More »तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान आणि रोजगारासाठी सरसावले पुणे पोलीस
पुणे ः प्रतिनिधी तृतीयपंथीयांशी संवाद साधण्यासही आपल्याकडे कोणी धजावत नाही़. ते रस्त्यावरून जाऊ लागले तर बाजूला होऊन त्यांच्यापासून दूर जाणेच सर्व जण हिताचे समजतात़. अशा वेळी त्यांना नोकरीवर ठेवणे हे अवघडच. त्यामुळे त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे, एखादा व्यवसाय करता यावा यासाठी पुणे पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला असून शहरातील तृतीयपंथीयांना …
Read More »मशिदीवरील हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारची सोशल मीडियावर बंदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेत झालेल्या मशिदीवरील हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने व्हॉट्सअॅप, फेसबुक, यू ट्यूबसारख्या सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हल्ल्यानंतर सरकारने रविवारी चिलाऊसह अन्य ठिकाणी कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. फेसबुकवर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर चिलाऊ भागातील मुस्लिम- ख्रिस्ती समाजात दंगे उसळले होते. संबंधित व्यक्तीने टाकलेली पोस्ट धमकीची …
Read More »‘दंतेश्वरी लडाके’ करणार नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगड ः वृत्तसंस्था ’दंतेश्वरी लडाके’ नामक पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहे. ‘काट्याने काटा काढणे’ या म्हणीप्रमाणे आता नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शरण आलेल्या नक्षलवाद्यांचाच वापर केला जाणार आहे. त्यासाठी छत्तीसगड सरकारने ‘दंतेश्वरी लडाके’ नावाचे पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक तयार केले आहे. येथील नक्षलग्रस्त बस्तर …
Read More »क्षुल्लक कारणावरून युवकावर गोळीबार
पुणे ः प्रतिनिधी अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छर्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. अगोदर पत्ता माहीत नाही, असे का सांगितलेस म्हणून दारू पिल्यानंतर त्याला मरीआई गेटजवळ सोडताना त्याच्यावर छर्याच्या बंदुकीतून गोळीबार करून जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे़. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांकडून भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रशंसा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गेल्या काही काळापासून भारतात मतदानासाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएमबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत, मात्र येथील निवडणूक आयोगाचे काम आणि ईव्हीएमची कार्यप्रणाली पाहून प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या …
Read More »खासगी कारचालकांनाही भाडे घेण्यास मान्यता ; सरकार बनवतेय नवा नियम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस मोठी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून खासगी गाड्यांचा वापर कमर्शियल (व्यावसायिक) कारणासाठी करता यावा म्हणून परमिट जारी करण्याचा विचार सुरू आहे. नीती आयोगाने यासाठी एक पॉलिसी …
Read More »खासगी बस-जीपच्या अपघातात 15 जण ठार
हैदराबाद ः वृत्तसंस्था हैदराबाद येथून बेंगळुरुकडे जाणार्या खासगी बस आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी हा अपघात घडला असून यामध्ये अन्य सहा जण जखमी असल्याचेही समजते. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कुरनुल जिल्ह्यातील वेलदुर्ती येथे हा अपघात घडला. अपघातातील मृत जोगुलम्बा गडवाळा …
Read More »काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी?
उपखंडात नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, ही दहशतवादी संघटना आता काश्मीर खोर्यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा संघटनेने …
Read More »हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाचे’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकार्यांकडे ‘अपाचे’ हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर 22 ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे. अॅरीझोनामध्ये ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. ‘अपाचे’ हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper