चांद्रयान-2च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदित झाला. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करीत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-2च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, पण चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता, असे पंतप्रधान नरेंद्र …
Read More »खैरात वाटणं थांबवा, केजरीवाल सरकारला फटकारले
नवी दिल्ली : महिलांना मेट्रोमध्ये फुकट प्रवास देण्याची घोषणा करणार्या दिल्लीतील केजरीवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे. फुकट प्रवासाची सुविधा दिल्यास दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. जनतेच्या पैशाची अशा पद्धतीने दिल्ली सरकारने उधळपट्टी करू नये, असे सांगतानाच दिल्ली सरकारकडून होणारी खैरात आम्ही रोखू शकतो. …
Read More »विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; मोदींचा दौरा रद्द
नागपूर : प्रतिनिधी नागपूर हवामान विभागाने विदर्भातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी (दि. 7) अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा …
Read More »चंद्रस्पर्शाच्या ‘विक्रमा’चे काऊंटडाऊन सुरू
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले महत्त्वाकांशी चांद्रयान-2 शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे …
Read More »भारत-रशिया संबंध मजबूत
खासगी उद्योग सहकार्यांपर्यंत पोहोचले; पंतप्रधानांचे प्रतिपादन रशिया : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिवस्तोक येथे आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या पूर्ण सत्रामध्ये भारत-रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केले. भारत-रशिया संबंधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे. त्यामुळे हे संबंध आता केवळ राजकीय संबंध राहिलेले नसून खासगी उद्योगांच्या पक्क्या सहकार्यांपर्यंत …
Read More »पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट
19 जण ठार, अनेक जखमी गुरुदासपूर (पंजाब) ः वृत्तसंस्था पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, दोन इमारतीत 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये …
Read More »श्रीरामपूरमध्ये ‘रयत’च्या शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण
नगर : रामप्रहर वृत्त श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संकुलांतर्गत विविध इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा शुक्रवारी (दि. 30) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …
Read More »नव्या भारतात आडनावाला महत्त्व नाही : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : हा नवा भारत आहे. येथे आडनावाला महत्त्व नाही, तर तुमच्यात तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काय क्षमता आहे याला महत्त्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी देशवासीयांशी संवाद साधत …
Read More »ईलाव्हेनिलचा ‘सुवर्ण’वेध!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताची उदयोन्मुख नेमबाज ईलाव्हेनिल व्हालारिव्हन हिने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेचे स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली आहे. 20 वर्षीय ईलाव्हेनिलने 251.7 इतके गुण कमावले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोश (250.6) आणि चायनीज तैपईच्या यिंग लिन …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पुणे ः प्रतिनिधी फोटोशूटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक मंदार कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. मंदारने बळजबरी बिकनी फोटोशूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात 23 ऑगस्टला तिने तक्रार दाखल केली होती. जानेवारीत मंदार आणि पीडित मुलीची भेट एका नाट्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper