रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील झाडगाव येथे एसटी बस उलटून 23 शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. कासारवेलीहून शहर बस रत्नागिरीकडे येत असताना झाडगाव लघुउद्योग वसाहत रोडवर हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More »कोल्हापूरमधील तिलारी घाटात दरड कोसळली
कोल्हापूर : प्रतिनिधी चंदगड तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी (दि. 5) दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला डोंगर खचून खाली ढासळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खचलेला भाग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, तेथून …
Read More »जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका
जालना : प्रतिनिधी एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या …
Read More »हजारो फुटांच्या उंचीवर आयटीबीपीची आव्हानात्मक मोहीम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सकडून हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये 21 हजार फुटांच्या उंचीवर एक मोहिम हाती घेण्यात आली होती. काही गिर्यारोहकांच्या बचावासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली होती. गिर्यारोहकांच्या या गटात एकूण 12 जणांचा सहभाग होता. ज्यामध्ये 11 परदेशी तर, एका भारतीय नागरिकाचा समावेश होता. 11 …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू
श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारी येथे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस केशवनहून किश्तवाड येथे निघाली होती, …
Read More »जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट व्हावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच त्यांनी मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्याच मन की बात कार्यक्रमात त्यांनी जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी या …
Read More »काँग्रेस अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदेंची वर्णी?
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अखेर नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग आला असून, गांधी घराण्यावर प्रचंड निष्ठा असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राहुल गांधी यांचे उत्तराधिकारी असतील, अशी माहिती पुढे येत आहे. काँग्रेस पक्षाची धुरा कुणाच्या हाती द्यायची, यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बराच खल केला. गांधी कुटुंबीयांशीही …
Read More »आरोपी बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
संरक्षक भिंत कोसळून मृत्यू प्रकरण पुणे ः प्रतिनिधी शुक्रवारी रात्री पुण्यातील कोंढवा भागात सीमा भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यांना रविवारी (दि. 30) जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस …
Read More »पाकला चोख प्रत्युत्तर दिल्यानेच अभूतपूर्व विजय
गिरीश महाजन यांचे प्रतिपादन नाशिक ः प्रतिनिधी देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत 303 जागांवर भाजपचे खासदार निवडून …
Read More »घोडीवलीतील महिला दारूबंदीसाठी आक्रमक ; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या घोडीवली कांढरोली गावात असणार्या दिवासीवाडीत छुप्या मार्गाने गावठी दारू विक्री सुरू असल्याने अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत. यातून पुढील पिढी वाममार्गाला लागू नये यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी दारूबंदीबाबत खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे घोडीवली आदिवासी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper