आंबेगाव ः प्रतिनिधी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी (ढोबळेवाडी) येथील शेतकरी रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ ढोबळे यांच्यावर सध्या पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या शेतातील दैनंदिन कामे …
Read More »वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल सभेत ‘छोटा पाकिस्तानचा’ उल्लेख
सोलापूर ः प्रतिनिधी अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या परिसरात त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत, मात्र दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या एका प्रचारसभेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर त्यांच्या समर्थकाची जीभ घसरली. सोलापूर येथील नई जिंदगी हा परिसर मुस्लीमबहुल भाग आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे समर्थक …
Read More »देहव्यापारातील विदेशी तरुणी ‘काळ्या यादीत’
नागपूर ः प्रतिनिधी शहरातील विविध भागांत दिवसेंदिवस देहव्यापार फोफावत असून आता या क्षेत्रात विदेशी तरुणींचाही शिरकाव झाला आहे. पर्यटन व्हिसाच्या नावावर देशात येणार्या विदेशी तरुणी देहव्यापार करीत असल्याची धक्कादायक बाब अनेक प्रकरणांमधून समोर आली आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी त्यांचा व्हिसा रद्द करून पुन्हा त्यांना भारताचा व्हिसा मिळणार नाही याकरिता ‘काळ्या …
Read More »काँग्रेसला झटका; फेसबुकने 687 पेसेज, अकाऊंट हटवली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मीडियावर निवडणूक प्रचाराने जोर धरलेला असतानाच फेसबुकने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. फेसबुकवरील काँग्रेसशी संबंधित 687 पेसेज आणि अकाऊंट डिलिट केली आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसशी संबंधित काही फेसबुक पेज आणि अकाऊंटवरून खोट्या बातम्या, खोटी माहिती प्रसारित केली जात होती. …
Read More »‘पुतण्याकडून पवारांची हिट विकेट’
वर्धा : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 1) वर्ध्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत, कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. पवारांवर …
Read More »‘इस्रो’ची आणखी एक भरारी
श्रीहरीकोटा : वृत्तसंस्था भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे 28 नॅनो उपग्रहांचे सोमवारी (दि. 1) श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी ‘इस्रो’ने केली. …
Read More »उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा ऑस्ट्रेलियाकडे कल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा कल आता ऑस्ट्रेलियाकडे वाढत चालला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्रवेश घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018मध्ये जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने जारी केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या यादीतून ही आकडेवारी समोर …
Read More »नर्सिंगचा ‘जीएनएम’ अभ्यासक्रम होणार बंद
अकोला ः प्रतिनिधी जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी म्हणजेच ‘जीएनएम’ हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात नोटीफिकेशन जारी करण्यात आले असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी …
Read More »म्युझियममध्ये चोरी करणारे तिघे गजाआड
लोणावळा ः प्रतिनिधी लोणावळा येथील सुनील वॅक्स म्युझियममध्ये गल्ल्यामधील दोन लाख रुपये, दोन संगणकाचे मॉनिटर व एक एलइडी टीव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरून राजस्थान येथे पोबारा केलेल्या तीन जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार …
Read More »राहुल गांधींना पराभूत करणार; डाव्यांचा निर्धार
तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी पुकारलेली थेट लढाई असून, येथे त्यांना पराभूत करू, असे डाव्या नेत्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper