रिषभचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीने केली गोलंदाजी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघाचा कसून सराव सुरू आहे. न्यूझीलंडने यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून स्वतःला तयार केले असले तरी त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय खेळाडूही समर्थ आहेत. लंडन दौर्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाने दोन …
Read More »खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
मोदी सरकारचा शेतकर्यांसाठी मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामोदी सरकारने देशातील शेतकर्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. …
Read More »माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपमध्ये
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापुढील वर्षी होणार्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यूपीए-2च्या काळात केंद्रात मंत्रिपदी राहिलेले यूपीतील वरिष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी बुधवारी (दि. 9) भाजपचा …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत संतापले
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ठाकरेंनी माहिती दिली. या वेळी एका प्रश्नावरून ते संतापल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान …
Read More »देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे होणार मोफत लसीकरण
केंद्र सरकारने उचचली जबाबदारीपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 7) देशवासीयांशी संवाद साधताना लसीकरणासंदर्भात ही मोठी घोषणा केली.देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने कोविड योद्धे आणि 45 वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी …
Read More »भारतीय कुस्ती महासंघाला सुमितमुळे 16 लाखांचा दंड
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकुस्तीपटू सुमित मलिक उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळल्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे. ‘डब्ल्यूएफआय’ला टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान गमवावे लागणार आहे. त्याचबरोबर 16 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.गेल्या महिन्यात बल्गेरिया, सोफिया येथे झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत सुमितने 125 किलो …
Read More »‘सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, अनेक सुपर मुख्यमंत्री’; अनलॉकच्या गोंधळावर फडणवीसांचा निशाणा
नागपूर ः राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत व बाकीचे सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री असे आहेत जे स्वतःला मुख्यमंत्री समजतात व घोषणा करतात, असा टोला फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 4) प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या …
Read More »मान्सून आज भारतीय किनार्यावर धडकणार; हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मान्सून सोमवारी (31 मे) भारताच्या दक्षिण किनार्यावर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे केरळच्या दक्षिणेकडील भागात पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी …
Read More »मोदी सरकारच्या यशस्वी सात वर्षांनिमित्त अमित शाहांच्या भावना
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा …
Read More »पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; ऑक्सिजन वॉरियर्सचे केले कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशाच्या कानाकोपर्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. यासाठी रात्रंदिवस झटणार्या ऑक्सिजन वॉरियर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) मन की बात कार्यक्रमातून कौतुक केले. या वेळी त्यांनी देशातील विविध विषयांवर भाष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper