नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना संकटात देशभरातील 25 राज्यांत असणार्या स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्र सरकारने दिलासा देत तब्बल 8923.8 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाकडून 25 राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरीत करण्यात आला असून, हा निधी गाव, तालुका आणि जिल्हा या पंचायतराजच्या तिन्ही स्तरांसाठी …
Read More »कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान शनिवारी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. ’ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने कोरोनावर उपचारासाठी डीआरडीओकडून तयार करण्यात आलेल्या आणखीन एका औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या ’इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अॅण्ड अलायन्स सायन्सेस’ तसेच हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्रित …
Read More »देशात कोरोनाचे तांडव
24 तासांत चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्यूचे अक्षरशः तांडव पहायला मिळत असून, देशात अवघ्या 24 तासांमध्ये चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद आहे, तसेच सलग चौथ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळून …
Read More »लसीकरणाचा वेग कायम राखा
पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठकीत राज्यांना सूचना नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 6) उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना संसर्गाचा राज्य आणि जिल्हानिहाय आढावा घेतला. या वेळी पंतप्रधानांनी औषधांची टंचाई आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाचा वेग कायम राखावा, अशी …
Read More »गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर : नितीन गडकरी
वर्धा : येथे रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी ते पुरविले जाईल, पण वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील …
Read More »कोरोनाची तिसरी लाट अटळ; वैद्यकीय सल्लागारांचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताहेत. त्यासोबतच मृतांचा आकडादेखील सातत्याने 3500च्या वर आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यापासून बचावासाठी देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरजही त्यांनी या वेळी अधोरेखित केली …
Read More »मराठा आरक्षण रद्द
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयराज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश व नोकर्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणार्या याचिकांवर बुधवारी (दि. 5) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला …
Read More »परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ
बीसीसीआय करणार चार्टर्ड फ्लाइटची सोय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलचे 14वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे, पण काही देशांनी भारतातून येणार्या विमानसेवा रद्द केल्याने मायदेशात कसे जायचे, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 15 मेपर्यंत भारतातील विमानसेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात …
Read More »‘रेमडेसिवीर’च्या उत्पादनाला वेग
केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा तसेच औषधांची कमतरता भासू लागली आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर या कोरोनाच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्या औषधाचा तुटवडाही भासू लागला आहे. अशातच आता भारतातील रेमडेसिवीरचे उत्पादन वेगाने वाढवले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री …
Read More »ममतांना निवडणूक आयोगाचा झटका
पुन्हा मतमोजणीची मागणी फेटाळली नंदीग्राम ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आपले पूर्वीचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीतील पराभवानंतर पुन्हा मतमोजणी करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, रिटर्निंग ऑफिसरचा …
Read More »