संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख …
Read More »17 खासदारांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सोमवार (दि. 14)पासून प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यातच कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये भाजपचे 12, वायएसआर काँग्रेसचे दोन आणि शिवसेना, डीएमके व आरएलपीच्या प्रत्येकी …
Read More »आजपासून संसदेचे अधिवेशन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेच्या अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून, खासदारांना डिजिटल पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयके सादर करणार आहे. त्यापैकी 11 अध्यादेश आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश …
Read More »आता अयोध्येत उद्धव ठाकरेंचे स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार
विश्व हिंदू परिषदेची घोषणा अयोध्या : वृत्तसंस्थामुंबई महापालिकेकडून बांधकाम अवैध ठरवून अभिनेत्री कंगना रानौत हिचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. आता विश्व हिंदू परिषदेने यापुढे उद्धव ठाकरेंचे अयोध्येत स्वागत होणार नाही तर तीव्र विरोध केला जाईल, अशी घोषणा केली आहे. ’उद्धव ठाकरे …
Read More »देशात कोरोना रुग्णांचा विक्रम
24 तासांत आढळले 96 हजारांहून अधिक रुग्ण नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देश नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. शुक्रवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशात 96 हजार 457 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1357 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. …
Read More »नवे शैक्षणिक धोरण भारताला नवी दिशा देणारे : मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थानवे शैक्षणिक धोरण 21व्या शतकातील भारताला नवी दिशा देणारे ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षण या विषयावरील एका संमेलनात ते सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण हे …
Read More »मराठा आरक्षणाला स्थगिती; अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; मविआ सरकारला मोठा धक्का
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असे सांगत न्यायालयाने या आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपविण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च …
Read More »कंगना मुंबईकडे रवाना
मनाली : वृत्तसंस्था अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तिने केलेल्या वक्तव्यावर विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव सादर झाला आहे, तर दुसरीकडे कंगनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने करून 24 तासांत कागदपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना एक दिवस आधीच मनालीच्या घरातून मंगळवारी (दि. 8) मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, राज्याचे …
Read More »हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची ‘डीआरडीओ’कडून यशस्वी चाचणी
बालासोर : वृत्तसंस्थाओडिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी (दि. 7) भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळेहवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत …
Read More »भारत ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या दिशेने : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था21व्या शतकातील भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांतील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भातील परिषदेत ते बोलत होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकर्या, कामाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper