Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

अखेर न्याय झाला!

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवले नवी दिल्ली : वृत्तसंस्थानिर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी (दि. 20) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. मुकेश सिंग (वय 32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे उशिराने का होइना पण निर्भयाला न्याय …

Read More »

रविवारी देशभरात जनता कर्फ्यू

पंतप्रधान मोदी यांचे आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करीत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, अशी मागणी मी करीत आहे. रविवारी (दि. 22) सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान …

Read More »

ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग अनिश्चित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. …

Read More »

परदेशी पर्यटकांना भारतात ‘नो एन्ट्री’

15 एप्रिलपर्यंत व्हिसावर बंदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापरदेशातून भारतात आलेल्या बहुतांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता 15 एप्रिलपर्यंत पर्यटक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70च्या वर पोहोचली आहे. यामध्ये 17 परदेशी रुग्णांचाही समावेश आहे. सध्या देशातील 12 राज्यांमध्ये …

Read More »

ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत हाती घेतले ‘कमळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी (दि. 11) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्ष अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. भाजपत प्रवेश करताना शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. यापूर्वी जी काँग्रेस होती ती आता नाही, असे त्यांनी नमूद केले.मी …

Read More »

मध्य प्रदेशात राजकीय धूळवड

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्थामध्य प्रदेशात धूळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अनंत भगवान दीक्षित (वय 67) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी (दि. 9) सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.  गेल्या चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असलेल्या दीक्षित यांनी ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे आणि त्यानंतर पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून …

Read More »

करोना वायरचा फटका चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिकलाही?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ’करोना’ वायरसचा फटका आता चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरही होणार असल्याचे दिसत आहे. जर ’करोना’ वायरस आटोक्यात आणला नाही तर ऑलिम्पकही रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. दर चार वर्षांनी क्रीडा जगताचा महाकुंभ समजल्या जाणार्‍या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील …

Read More »

पंतप्रधान मोदींचा नारीशक्तीला सलाम!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण जगभर रविवारी (दि. 8) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन गुगलने महिलांच्या योगदानाला डूडल व्हिडीओ अर्पण केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, …

Read More »

केरळात कोरोनाचे पाच नवे रुग्ण; संख्या पोहचली 39वर

तिरुअनंतपुरम (केरळ) : वृत्तसंस्था  भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 8) केरळ राज्यात पाच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. याबरोबर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून हे …

Read More »