Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

लॉकडाऊन वाढणार?

राज्यांच्या मागणीवर केंद्र सरकारचे विचारमंथन नवी दिल्ली : वृत्तसंस्थामहाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या मागणीवर केंद्र सरकारने विचार सुरू केला असून, 14 एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊन …

Read More »

लॉकडाऊन लांबणार?

महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. कोरोनाच्या संकटातून देशातील जनतेची सुखरूप सुटका करायची असेल, तर लॉकडाऊन वाढवावेच लागेल, असे मत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. एकीकडे अमेरिका-इटलीच्या तुलनेत आपल्याकडचे कोरोनासंबंधित आकडे बरेच लहान दिसत असल्याने असंख्य भारतीयांना हायसे …

Read More »

रविवारी रात्री 9 वाजता घरात दिवे उजळून सामुदायिक शक्ती दाखवा!

पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी मला आपल्या सर्वांची नऊ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ नऊ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत …

Read More »

कोरोनाविरुद्धचे युद्ध 21 दिवसांत जिंकायचेय!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर बुधवारी (दि. 25) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. आता आपल्याला 21 दिवसांत करोनाविरोधातील युद्ध जिंकायचे …

Read More »

आजपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासह जगभरात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसर्‍यांदा देशाला संबोधित करताना बुधवारी (दि. 24) संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची मोठी घोषणा केली आहे. मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूने दाखवून दिले की देशावर ज्या वेळी कोणतेही संकट येते तेव्हा …

Read More »

राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यसभेच्या 18 जागांसाठी 26 मार्च रोजी होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 26 मार्चला देशभरातील सात राज्यांमध्ये एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. राज्यसभेत रिक्त झालेल्या एकूण 55 जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची आहे. त्यापैकी 37 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली …

Read More »

उद्यापासून देशांतर्गत विमानसेवाही होणार बंद

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमान सेवादेखील खंडीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी (दि. 23) घेतला. या निर्णयानुसार 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी …

Read More »

सर्व राज्यांत लॉकडाऊन

केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व राज्यांत लॉकडाऊन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत. काही राज्यांत अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण जनता …

Read More »

कोरोनाविरोधात आज संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाला देशात प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. 22) संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. अनेकांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, यात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र होत असून, भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पीटरसनही म्हणतो, सरकारी आवाहनाचे पालन करा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि. 23) जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनचे भारतीय क्रीडापटूंकडूनही कौतुक झाले. भारतात आलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू पीटरसन यानेही सर्वांना आपापल्या सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन करायला हवे, असे म्हटले आहे. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, …

Read More »