पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर शरसंधान नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. देशातील जनतेने फक्त सरकार बदलले नाही, नव्या विचाराने काम करण्याची संंधी आम्हाला दिली. आम्हीही काँग्रेसच्या वाटेने गेलो असतो, तर देश बदलला नसता, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा …
Read More »मराठा आरक्षणाला स्थगितीस ‘सर्वोच्च’ नकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्थामराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने बुधवारी (दि. 5) सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 17 मार्चला सुरू होणार आहे.राज्य सरकारने शिक्षण आणि …
Read More »अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी केंद्राकडून ट्रस्टची स्थापना
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत माहिती नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराची निर्मितीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिल्याचेही त्यांनी सांगितले.राम मंदिर …
Read More »वाढवण येथील बंदराला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात डहाणूजवळ वाढवण येथे प्रमुख बंदर उभारायला तत्वत: मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 65,544.54 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. वाढवण बंदर लँड लॉर्ड मॉडेलच्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50% …
Read More »‘सीएए’विरोधातील आंदोलनांमागे कारस्थान
पंतप्रधानांची आप, काँग्रेसवर सडकून टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था‘सीएए’विरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने योगायोग नाही, तर तो एक प्रयोग आहे. यामागे राजकारणाचे असे डिझाईन आहे, जे राष्ट्राच्या सौहार्दाला बाधा आणत आहे. कायद्याला केवळ विरोध असता तर सरकारच्या आश्वासनानंतर तो संपला असता, पण आप आणि काँग्रेसची …
Read More »‘शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली’
पुणे : प्रतिनिधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्या ‘सीएए’-‘एनआरसी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी …
Read More »विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची भरदिवसा हत्या
लखनौ : वृत्तसंस्था विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. 2) सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौत घडली. बच्चन हे मॉर्निंग वॉकला जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. रणजित बच्चन रविवारी सकाळी 6.30 वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. मित्रांसमवेत ग्लोब …
Read More »‘अर्थ’भरारी
मोदी सरकारचे सर्वसमावेशक बजेट नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प शनिवारी (दि. 1) सादर केला. सीतारामन यांनी 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचे हे बजेट संसदेत मांडले. यात त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती व विकासाच्या दृष्टीने दिलासादायक व सर्वसमावेशक घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री म्हणतात…भारतीय अर्थव्यवस्था …
Read More »सरकारचे काम व्यापार करणे नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत; अर्थसंकल्प सर्वंकष असल्याची भाजप नेत्यांची प्रतिक्रिया नवी दिल्ली : वृत्तसंस्था खाजगीकरण झाल्यामुळे ग्राहकांना फायदा झाला. सरकारचे काम व्यापार करणे नाही, अशी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एलआयसीचा खासगीकरण होत असल्याची टीका केली जात आहे. खाजगीकरण झाल्यामुळे ग्राहकांना फायदा झाला. आधी …
Read More »दिल्ली भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन
शुद्ध पाणी, दोन रुपये किलो पीठ, आणि विद्यार्थ्यांना मोफत वाहन देणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 31) आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांना शुद्ध पाणी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्याचे वचन भाजपने संकल्पपत्रात दिले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper