Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

सीएएला घाबरू नका -उद्धव ठाकरे; पंतप्रधानांच्या भेटीनंतर कायद्याबाबत अनुकूलता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सीएए आणि एनआरसीच्या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली असून हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या कायद्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिल्लीमध्ये शुक्रवार (दि. 21) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »

पूनमची घेतली कांगारूंची फिरकी; भारताचा दणक्यात विजय

सिडनी : वृत्तसंस्था पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे लक्ष्य दिले होते, पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 115 धावांवरच ऑल आऊट केले. भारताने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात …

Read More »

‘कोरोना‘च्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय आला अडचणीत; सायबर सेलकडे तक्रार

पुणे ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील 15 दिवसांत बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील 10 दिवसांत 1100 मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दिनांक 4 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत सुमारे 150 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. …

Read More »

‘नाणार’वरून शिवसेनेत दुफळी

सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. रिफायनरीला समर्थन करणार्‍या विभागप्रमुखावर शिवसेनेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल 22 शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. सागवे आणि इतर गावांतील शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेनेच्या 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकार्‍यांनी राजीनामे देण्याचा निर्णय …

Read More »

पीडितेची प्रकृती गंभीर; अधिक उपचारासाठी मुंबईत हलवले

नाशिक : प्रतिनिधी निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकात पेटवून देण्यात आलेल्या महिलेची प्रकृती गंभीर बनली असून, तिला अधिक उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी (दि. 15) नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली होेती. लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव येथील एका विवाहित महिलेला चार जणांनी पेट्रोल टाकून तिला पेटवून …

Read More »

कॉलेज मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ

अमरावती : प्रतिनिधी प्रेम व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मात्र याच दिवसाचे औचित्य साधून एका महाविद्यालयाने त्या महाविद्यालयातील मुलींना एक शपथ दिली आहे. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसेच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही या वेळी मुलींनी केला. हल्ली तरुण वयातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणांंचे प्रमाण …

Read More »

वन डे मालिकेत भारत हरला, पण राहुल-श्रेयसने मने जिंकली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 5-0ने जिंकल्यानंतर वन डे मालिका यजमानांनी 3-0ने जिंकत भारताच्या व्हाईटवॉशला त्याच पद्धतीने उत्तर दिले. असे असले तरी के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीने आपल्या सर्वांगसुंदर खेळीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या के. एल. राहुलने …

Read More »

हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जनभावना तीव्र

आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा वर्धा : प्रतिनिधीहिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर जनभावना तीव्र बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला …

Read More »

झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण

भाजपची ताकद वाढणार रांची : वृत्तसंस्थाझारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी 14 वर्षांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी 17 फेब्रुवारीला रांचीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार …

Read More »

‘कोरोना’ : भारताचा चीनला मदतीचा हात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशा वेळी भारताने या शेजारच्या देशाला मदतीचा हात देऊ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत पावलेल्या नागरिकांबाबत शोक …

Read More »