नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील 100 टक्के नागरिकांना पहिली मात्रा देणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. त्यामुळे महापालिकेने 100 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरी आरोग्य केंद्रांकडे …
Read More »प्रलंबित मागण्यांबाबत चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचे आज मंत्रालयावर थाळी-घंटानाद आंदोलन
दखल न घेतल्यास 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी बुधवारी (दि. 27) दुपारी जेवणाच्या सुट्टीत राज्यव्यापी थाळी आणि घंटानाद आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही त्याची दखल घेतली नाही, तर मात्र 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा …
Read More »लोकल प्रवासासाठी आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लसीकरण अनिवार्य
मुंबई ः प्रतिनिधीराज्य सरकारने मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लोकल प्रवासासाठी लसीकरणाचा नियम लागू होणार आहे. याशिवाय लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी फक्त एक महिन्याचा पास दिला जात होता. आता तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरासाठीही लोकलचा पास दिला जाणार …
Read More »एसटी कर्मचारी बुधवारपासून करणार बेमुदत उपोषण
मुंबई ः प्रतिनिधीऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांवर अन्याय केला आहे. थकीत महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीच्या दराबद्दल ठोस कोणताही निर्णय न घेता फक्त पाच टक्के महागाई भत्ता दिल्याने राज्यभरातील एसटी कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व संघटना मिळून तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बुधवार …
Read More »अधिक पाण्यासाठी ‘मोरबे’ची उंची वाढवणार?
नवी मुंबई पालिकेची चाचपणी सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी ‘एमआयडीसी’च्या बारवी धरणातून मिळणार्या 65 दशलक्ष लिटर पाण्यात दिवसेंदिवस कमी पुरवठा होऊ लागल्याने नवी मुंबई पालिकेने पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यात मोरबे धरणात पाताळगंगा नदीचे पाणी आणून सोडण्याच्या प्रकल्पाला प्रदूषणामुळे पूर्णविराम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी मोरबे …
Read More »आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? ; व्हिडीओतून आरोप
मुंबई ः प्रतिनिधीआर्यन खान ड्रग्जप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली असून त्यातील आठ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने या व्हिडीओत केला आहे. या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणतो की, …
Read More »आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा घोळ; पेपर, वेळ, आसनव्यवस्थेत त्रुटी; विद्यार्थ्यांमध्ये संताप
मुंबई ः प्रतिनिधीआरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचे नाव घेईना. या परीक्षेत रविवारी (दि. 24) पुन्हा घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचे समोर आले, तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेतही घोळ झाला. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थ्यांना आसन क्रमांक न मिळाल्याच्या …
Read More »जिम्नॅस्ट निशांत करंदीकरची भारतीय संघात निवड
मुंबई ः प्रतिनिधी जपानमध्ये होणार्या 50व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या सिनिअर गटासाठी व ढाका येथे होणार्या सेंट्रल साउथ आशिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरिता ज्युनिअर व सिनिअर गटासाठी भारतीय संघाची नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर निवड करण्यात आली. यात आशियाई स्पर्धेत मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुलचा निशांत करंदीकर याची निवड झाली. निशांतने विशाल …
Read More »खारघरच्या आरोग्य केंद्रात डेंग्यु निदानाचे किट उपलब्ध
भाजप खारघर नगरसेवक व पदाधिकार्यांच्या मागणीला यश खारघर : रामप्रहर वृत्त भाजप खारघर नगरसेवक व पदाधिकार्यांच्या वतीने पनवेल महापालिकेकडे केलेल्या मागणीनूसार खारघर सेक्टर 12 येथील नागरी आरोग्य केंद्रात डेंग्युचे निदान त्वरित होण्यासाठी अँटिजेन (एनएस 1) कार्ड टेस्ट किट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवक व पदाधिकार्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेत 407 विद्यार्थ्यांचे लसीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेंतर्गत नवी मुंबई महापालिकेने 22 ऑक्टोबरपासूनच 10 महाविद्यालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. शासनाने दिलेल्या उद्दीष्टानुसार 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर असून महाविद्यालयीन लसीकरणावर लक्ष केंद्रीत करत त्याठिकाणी विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper