नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना इराण येथून सफरचंद बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. सफरचंद खायला गोड, रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक असते; तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर …
Read More »गुळसुंदेतील पाणीसमस्या अधिवेशनात
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुळसुंदे परिसरातील या पाणीसमस्येवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या …
Read More »सेंट्रल पार्कची वेळ वाढवून द्यावी
नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडको प्रशासनाकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील सेंट्रल पार्कची वेळ वाढवून देण्याची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर संधू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सध्यस्थितीत सेंट्रल पार्क सकाळी 9 वाजता बंद करण्यात येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व्यायाम करण्यासाठी व …
Read More »खारघर येथे अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
खारघर : रामप्रहर वृत्त माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना खारघर भाजप जनसंपर्क कार्यालयात नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अभिवादन केले.थोर कवी, पत्रकार, वाङ्मयाचे अभ्यासक अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन या वेळी करण्यात आले. मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी त्यांचे जीवनचरित्र उलगडून सांगितले. या वेळी खारघर मंडलाध्यक्ष ब्रिजेश …
Read More »‘हिंमत असेल तर आमदारांचे निलंबन मागे आणि अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घ्या’
मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या नियम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तरी सभागृहाची मंजुरी मिळाल्यावर तो निर्णय प्रत्यक्ष अमलात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्यासाठी दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करीत आमदार प्रसाद लाड यांनी …
Read More »शक्ती विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
मुंबई : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील महिलांना सुरक्षा देणारे शक्ती विधेयक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी (दि. 23) विधानसभेत एकमताने मंजूर झाले. यासाठी विरोधी पक्ष भाजपने सातत्याने आवाज उठविला होता. हे विधेयक आता मंजुरीसाठी विधान परिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. …
Read More »वर्तमानपत्राचा कागद खाद्यपदार्थ ठेवण्यास वापरू नका; अन्न व औषध प्रशासन विभागाचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी वर्तमानपत्राचा वापर खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी करण्यात येऊ नये. अशा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 5 ऑगस्ट 2011पासून लागू करण्यात आला. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेला सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न …
Read More »विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीविरोधात अभाविप आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर स्वतःचे नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करीत मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले. या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेले दोन दिवस साखळी आंदोलन करीत आहे. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे अभाविपने बुधवारी (दि. 22) शिक्षणातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध निदर्शने केली. …
Read More »सिडकोच्या नवीन घरांची सोडत 15 जानेवारीला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या सुरू असलेल्या सिडकोच्या 24 हजार बांधकामांपैकी सात हजार लाभार्थीनी घरांची सर्व रक्कम भरल्याने वर्षअखेरपर्यंत त्यांच्या घरांची नोंदणी, करारनामे आणि ताबा अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडको पाच हजार नवीन घरांची सोडत काढणार आहे. ही सोडत 15 ते 26 जानेवारी दरम्यान काढली जाईल असे समजते. सिडकोने …
Read More »भाजपच्या ई-श्रम कार्ड शिबिराला प्रतिसाद
नवी मुंबई : बातमीदार भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांनी ई-श्रम कार्ड शिबिराचे आयोजन सानपाडा येथे केले होते. जवळपास 50 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत कार्ड काढून घेतले. मोदी सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या ई-श्रम कार्ड योजनेविषयी या वेळी जागृती करण्यात आली व माहिती देण्यात आली. …
Read More »