Breaking News

मुंबई – नवी मुंबई

ठाकरे सरकार कोकणात नाणार प्रकल्प राबविणार?

शिवसेनेच्या मुखपत्रात जाहिरात मुंबई : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील मते मिळवणार्‍या शिवसेनेने आता मात्र यू-टर्न घेतल्याचे दिसते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले …

Read More »

आजपासून भाजपचे प्रदेश अधिवेशन

आगामी वाटचालीची दिशा होणार स्पष्ट; नवी मुंबई सज्ज नवी मुंबई : बातमीदारभारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन 15 व 16 फेब्रुवारी रोजी नेरूळमधील स्व. राम कापसेनगर येथे होत असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून फेरनिवड झालेले चंद्रकांत पाटील या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. …

Read More »

…तर सीएए, एनआरसी विरोधातील मोर्चांना चोख उत्तर देऊ : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत, त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले, तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा गर्भित इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी …

Read More »

प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न -आ. मंदा म्हात्रे

नवी मुंबई : प्रतिनिधी 1971 वर्षापासुनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणचा प्रलंबित प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून अखेर मार्गी लावला गेला. शासनाने नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांच्या सिटी सर्वेक्षणास बेलापूर गावामधून सुरुवातही केली. परंतु एवढ्या मोठ्या कार्याचे श्रेय ग्रामस्थांमधून आमदार मंदा म्हात्रे यांना मिळू नये, याकरिता काही नतद्रष्ट विरोधी बोगस …

Read More »

मतभेद विसरुन एकत्र येऊयात; महिला सुरक्षेसाठी अमृता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी आपल्यातील भांडणे व मतभेद विसरून महिलांच्या सुरक्षितेसाठी एकत्र येऊयात असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे एका महिला प्राध्यापक तरुणीवर …

Read More »

शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा काँग्रेसचा डाव : पाटील

पुणे : प्रतिनिधीकाँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. अगदी योजनाबद्धपणे हे सगळे सुरू आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जावी आणि महाराष्ट्रात शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी, असा यामागचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी हा डाव वेळीच ओळखावा, असे भाजपचे …

Read More »

राज्याच्या गुंतवणुकीस धोका

मुख्यमंत्र्यांच्या हतबलतेवर भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधीराज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश …

Read More »

तिथीचा हट्ट सोडा, 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख घोषित करा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचे साकडे मुंबई : प्रतिनिधीतिथीचा हट्ट सोडून 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली जावी, असे आवाहन राज्यातील सत्तेत भागीदार असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची …

Read More »

डॉक्टर उतरले मैदानावर; पापडीचा पाडा येथे क्रीडादिन

नवी मुंबई : बातमीदार : मदरहूड हॉस्पिटल आणि खारघर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 1) तळोजा येथील पापडीचा पाडा मैदानावर क्रीडादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वच स्तरातील नागरिकांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्याकरिता स्वतः डॉक्टर आणि कर्मचारी मैदानावर उतरले होते. डॉक्टरांच्या विविध संघांमध्ये या ठिकाणी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …

Read More »

झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही

मुंबई ः प्रतिनिधीझोपलेल्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन जी भूमिका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खडे बोल …

Read More »