नौसैनिक कुणाकुणाला भेटले, त्या सर्वांची होणार चाचणी मुंबई ः प्रतिनिधी – वेगाने फैलावणार्या कोरोनाच्या जाळ्यात आता भारतीय नौसैनिकही अडकल्याचे समोर आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता नौसेनेकडून ’कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ हे एक मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. याद्वारे नौदलात कोरोनाने शिरकाव कसा केला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न …
Read More »आधार लिंक असो-नसो सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य द्या!
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरातील सर्व रेशनिंग दुकानांमध्ये सर्व अन्नधान्याचा पुरवठा करणे तसेच शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी ूआमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य …
Read More »एपीएमसीमधील आणखी एका व्यापार्याला लागण
नवी मुंबई : बातमीदारवाशी एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापार्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाजारातील अन्य व्यापार्यांसह माथाडी कामगार, वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी सानपाड्यातील पामबीचजवळ राहतो. त्याला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मसाला मार्केटमधील व्यापार्यास कोरोनाची लागण झालेली आहे.धान्य मार्केटमध्ये गुरुवारी डाळी आणि …
Read More »राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजारांवर
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3100वर पोहोचला आहे, तर आतापर्यंत 300 लोक या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत राज्यात 194 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे. 83 टक्के मृतांना दुर्धर आजार होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ज्यांचे …
Read More »2.8 टन वजनी नादुरुस्त रोहित्र महावितरणने सहा तासांत बदलले
नवी मुंबई : बातमीदार – महावितरण नेरुळ उपविभाग अंतर्गत येणार्या जुईनगर येथे मच्छीमार्केट सेक्टर 23 शेजारी असलेले 630 केव्हीए क्षमतेचे रोहित्र दि. 14 एप्रिल रोजी दुपारी वाजताच्या सुमारास नादुरुस्त झाला होता. त्यामुळे सेक्टर 23 जुईनगर ह्या परिसरात राहणारे सुमारे 300 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युतपुरवठा शेजारी असलेल्या …
Read More »कोरोनाचा फटका : आंबा व्यापारी हवालदिल
खरेदीदारच येत नसल्याने फळ मार्केट बंद नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, मसाला, भाजीपाला व दाणा मार्केट बुधवारपासून सुरू झाले. एपीएमसीमधून सर्वाधिक माल हा मुंबईत पाठवला जातो. मात्र सध्या मुंबईच कोरोनामुळे लॉकडाऊन झाली असल्याने मालाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज म्हणून …
Read More »गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार
मुंबई : प्रतिनिधीयंदा अल निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्याने सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान 96 ते 104 टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविलेला हा पहिला अंदाज आहे. पावसाच्या चारही महिन्यांत अल …
Read More »वांद्रे येथील मजुरांच्या उद्रेकाला राज्य सरकारच जबाबदार -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी – आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी मंगळवारी वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर हा उद्रेक झाल्याने त्यावर आणखीच चिंता व्यक्त होत आहे. यावरून आता राजकारणही तापू लागले असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »‘सीएसआर कायदा काँग्रेसच्या काळातला, तरीही लोक राजकारण करताहेत’
मुंबई : प्रतिनिधी – कोरोना संकटाला रोखण्यासाठी राज्य सरकारला योग्य व्यवस्थापन आणि कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे, म्हणून असे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते …
Read More »अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून दारुविक्री करणार्या मायलेकावर गुन्हा
नवी मुंबई : प्रतिनिधी स्कोडा कारवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून कारमधून दारुची विक्री करणार्या तरुणाला परिमंडळ-1 मधील अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे. वरुण कमलेश खेमाणी (28) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या स्कोडा कारमधून विदेशी मद्याच्या हजारो रुपये किमतीच्या बाटल्या तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper