Breaking News

मुंबई – नवी मुंबई

तीन मेट्रो मार्गांना मान्यता

मुंबई : प्रतिनिधी कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग 12) सविस्तर प्रकल्प अहवालास, तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंगळवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 आणि वडाळा ते छत्रपती …

Read More »

महाराष्ट्र होणार चूल-धूरमुक्त राज्य शासनाकडून मिळणार गॅसजोडण्या

मुंबई ः प्रतिनिधी चूलमुक्त-धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणीधारकांना राज्य शासनाकडून गॅसजोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 23) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 अंतर्गत लाभ न मिळू शकलेल्या नागरिकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात …

Read More »

सायबर गुन्ह्यांच्या तपासाला येणार वेग

नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्पाचे मुख्यालय नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणार्‍या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील जागा आता ताब्यात मिळाली. या ठिकाणी ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मुख्यालय उभारण्यात येणार …

Read More »

निवडणुकांपूर्वी सिडकोच्या घरांसाठी अर्जविक्री

नवी मुंवई : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडकोच्या 90 हजार घरांसाठी अर्ज विक्री सुरू करण्याचे संकेत सिडकोच्या संबंधित विभागाने दिले आहेत. त्यामुळे मागील सोडतीत संधी हुकलेल्या ग्राहकांना घरासाठी पुन्हा एकदा नशीब आजमावता येणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरांसाठी प्रत्यक्ष अर्ज विक्री …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा ; भाजप कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकत्र लढणार आहे. त्यासाठी जागावाटप लवकरच होईल. त्यामुळे निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 21) भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत केले. मुंबईमधील गोरेगाव येथे झालेल्या भाजप कार्यसमितीच्या बैठकीला पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय …

Read More »

कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांची बाजी

30 राज्यांतील संघ सहभागी; पाच सुवर्णांसह 12 पदकांची कमाई मुंबई ः प्रतिनिधी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटांमध्ये वर्चस्व मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे 62वा राष्ट्रीय कर्तव्य मेळावा 16 ते 20 जुलै या कालावधीत झाला. त्यामध्ये देशभरातील 30 राज्य पोलीस संघाचे 1250 स्पर्धक …

Read More »

डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई : रामप्रहर वृत्त आगरी दर्पणच्या डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 19) त्यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये यांच्या हस्ते म. सुंच्या निवासस्थानी मुलुंड येथे कौटुंबीक वातावरणात झाले. प्रारंभी कवी अरुण म्हात्रे यांनी डॉ. म. सु. पाटील यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या …

Read More »

सिडको सहव्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. नारनवरे

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार गुरुवारी (दि. 18) सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे स्वीकारला. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी डॉ. नारनवरे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. सन 2009च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी …

Read More »

पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळेचे आयोजन

मुंबई ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे पत्रकारितेकडे ओढा असलेल्या बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता विद्यानगरी कालिना येथील गरवारे व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या प्रेक्षागारात एक विनाशुल्क पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत संस्थेच्या पत्रकारिता वर्गाचे माजी विद्यार्थी आणि नामवंत पत्रकार मार्गदर्शन करतील. …

Read More »

निवृत्त न्या. ग. मो. खांबेटे यांचे निधन

मुंबई : लघुवाद न्यायालयाचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य न्यायाधीश गणेश मोरेश्वर खांबेटे ऊर्फ आबासाहेब खांबेटे यांचे सोमवारी (दि. 15) वृद्धत्वाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. एक कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या मागे पत्नी, पत्रकार सुपुत्र सतीश खांबेटे, दोन कन्या, नातवंडे आणि अन्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने …

Read More »