पनवेल : वार्ताहर बँकिंग उद्योगात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई झोनच्या अंतर्गत येणार्या नवीन पनवेल शाखेने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शिक्षक दिन मोठ्या थाटात साजरा केला. या वेळी महात्मा फुले महाविद्यालय, पनवेलचे अर्थशात्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. नरेश मढवी, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष …
Read More »कलावंतांना मानधन देण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर मागील दोन वर्षांपासून कोविड 19 या महामारीमुळे भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून होणार्या समाजप्रबोधनाचे साप्ताहिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वारकरी साहित्य परिषद, पनवेल तालुका, रायगड यांच्यातर्फे कलावंतांना मानधन मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तसीलदार विजय तळेकर यांना निवेदन देण्यात आले. …
Read More »पनवेलमध्ये महिलांची सुखरूप सुटका
नगरसेवक राजू सोनी यांची सतर्कता पनवेल : वार्ताहर शहरातील टपाल नाका येथील बोहरा यांच्या घराचा लाकडी जिना कोसळला. त्यामुळे त्या घरातील 85 वर्षांच्या आजीबाई आणि वीस ते बावीस वर्षांच्या मुलीला बाहेर निघता येत नव्हते. याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच त्यांनी तत्परतेने पनवेल महानगरपालिका व अग्निशमन दलाला पाचारण केले. …
Read More »गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट
दहा दिवसांचे गणपतींचे दीड दिवसात विसर्जन नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने एकट्या नवी मुंबईत दोन हजार जणांचा बळी घेतल्याने या उत्सवावर आज दुःखाचे सावट पसरले आहे. याचा सर्वाधिक फटका हा येथील घरगुती गणेशोत्सवाला बसला आहे. साहजिक येथील शहरी भागाबरोबरच विशेषतः गावठाणातील पाच, दहा, चौदा व एकवीस दिवसांचे गणपती आज …
Read More »नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र मनपाकडून मंजूर
स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यासाठीची मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर 46 विषय मांडण्यात आले होते. …
Read More »रोहा बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. या उत्सवासाठी लागणार्या सर्व साहित्याची खरेदीसाठी रोहा बाजारपेठेत गुरुवारी (दि. 9)नागरिकांची तुडुंब गर्दी झाली आहे. या गर्दीत कुठेही कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. गणेशोत्सवासाठी रोहा तालुक्यात चाकरमानी मोठ्या प्रमाणात आले आहेत. रोहा ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे. तालुक्यातील मेढा, …
Read More »महाड शहरात वाहतूक कोंडी
गाळे रिकामे दुकाने रस्त्यावर महाड : प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढणार्या वाहनांमुळे महाड शहरात वाहतूक कोंडीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. शहर वाहतूक पोलीस केवळ पावत्या फाडण्याचे काम करत आहेत तर नगरपालिका कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. महाडमध्ये वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्यातून उद्भवणारी वाहतूक …
Read More »जिल्हा परिषदकडून नेहमी निधी अडविण्याचे काम
वैकुंठ पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांनी विकासकामांसाठी आणलेला निधी अडविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप राजिपचे माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील यांनी बुधवारी (दि. 8)पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आमदार रविशेठ पाटील यांनी शिर्की रस्त्यासाठी कोणातच निधी दिला नसल्याचा …
Read More »गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न
अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न आले आहे. गणेशभक्त गुरुवारी (दि. 9) मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडीत अडकले. गणेशभक्त कोकणात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी रायगड जिल्ह्यातील खारपाडा, नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर आणि माणगाव या …
Read More »कर्जत भाजपकडून पूरग्रस्तांना टीटीचे इंजेक्शन
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय सेलच्या माध्यमातून कर्जत पूरग्रस्तांना टीटीचे इंजेक्शन देण्यात येत आहेत. उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी कर्जत शहरातील अनेक घरांत घुसून मोठे नुकसान झाले होते. या पूरग्रस्त भागात भाजप वैद्यकीय सेल तर्फे टीटी इंजेक्शन देण्याचे कॅम्प आयोजित केले जात आहेत. वैद्यकीय सेल तालुका संयोजक डॉ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper