उसरोली ग्रामपंचायतीने वेधले होते लक्ष मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील अदाड गावाजवळील पूल हा मोडकळीस आला असून, पुराच्या पाण्यामुळे खचलासुद्धा आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिपच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी या पुलाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावाजवळ 1970 मध्ये …
Read More »कंत्राटी वाहनचालक, सफाई कर्मचार्यांची जि. प.समोर निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधी सहा महिन्याचे थकीत मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्हा परिषद (राजिप) अंतर्गत येणार्या आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या वाहनचालक आणि सफाई कामगारांनी बुधवारी (दि. 15) अलिबागेतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांना आपण आज ना उद्या कायमस्वरूपी सेवेत रूजू होऊ …
Read More »आघाडी सरकारविरोधात खोपोलीत जोरदार निदर्शने
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक खोपोली : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला व नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे ओबीसीविरोधी धोरण व नाकर्तेपणामुळेच ही वेळ आली आहे. भाजप खोपोली शहर ओबीसी मोर्चाने बुधवार (दि. 15) सकाळी दीपक हॉटेल चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात …
Read More »मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशात प्रत्येक नागरिक आपल्या मतांचा अधिकार वापरून लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो. या मतदारांची यादी आहे. ती वेळोवेळी अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात येत असते. आताही निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम घोषित …
Read More »युसूफ मेहेरअली सेंटरतर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा
पनवेल : वार्ताहर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ‘सायमन गो बॅक’ म्हणत सायमन कमिशनला विरोध करणारे, ‘चले जाव’ आंदोलनाचे नेते तथा मुंबईचे पहिले सर्वांत तरुण महापौर म्हणून ओळख असलेल्या युसूफ मेहेरअली यांच्या 118व्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागासह भारतातील आठ राज्यांत मागील सहा दशके शाश्वत ग्रामीण विकासाचे काम करणार्या युसूफ मेहेरअली सेंटरच्या …
Read More »दिलासा! उपचाराधीन रुग्णांत घट; नवी मुंबईतील कोरोना आकडेवारी स्थिर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेतील निर्बंध शिथिलीकरणानंतर 50 वर स्थिर असलेली कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत ती 100 पर्यंत गेली होती. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खरेदीसाठी झालेली गर्दी पाहता रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत होती, मात्र 100 वर असलेली दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. तर उपचाराधीन रुग्णही कमी होत …
Read More »खबरदारीला पर्याय नाही
गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील कोरोनासंबंधी परिस्थिती आणखीनच गंभीर होत असल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे केरळमध्ये अद्याप दुसरी लाटही पुरती ओसरलेली नाही. देशभरात कदाचित ऑक्टोबरच्या अखेरीस तिसरी लाट येईल असे सांगितले जाते. वेगाने लसीकरण राबवल्यास व सातत्याने कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेतल्यास आपण तिसर्या लाटेचा वेग आणि तीव्रता दोन्ही थोपवू शकू या …
Read More »मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा मराठा ठोक मोर्चातर्फे इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी पवित्रा
औरंगाबाद : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला तीन महिने उलटूनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा अडवणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. …
Read More »अनिल देशमुखांची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई : प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तातडीचा कोणताही दिलासा न देता हायकोर्टाने त्यांची याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी देशमुखांना त्यांची याचिका सुनावणीसाठी खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवर हायकोर्ट रजिस्ट्रीने घेतलेला आक्षेप आणि ईडीने उठवलेला सवाल हा योग्यच असल्याचे न्यायमूर्ती शिंदे यांनी …
Read More »रायगडात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप
अलिबाग, पनवेल : प्रतिनिधीलाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रायगडकरांनी मंगळवारी (दि. 14) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोपही दिला. पाहुण्या आलेल्या गौराईचा पाहुणचार झाल्यानंतर मंगळवारी त्यांचेही विसर्जन करण्यात आले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 56 हजार 535 गणेशमूर्ती, तर 14 हजार 429 गौरींचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper