उरण ः प्रतिनिधी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांत मिळणारे 27 टक्के राजकीय आरक्षण त्वरित पूर्ववत करावे यांसह विविध सात मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, अन्यथा शिवा संघटना संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेतृत्व करणार्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे राज्य शासनाला देण्यात आला आहे. याबाबत …
Read More »कलावंतांचे राज्य सरकारविरोधात आक्रोश आंदोलन
पनवेल ः वार्ताहर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे कलाकार आणि लोककलावंत यांचे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई व रायगडच्या कलाकारांनीदेखील सहभाग घेतला होता. या वेळी कलाकार आणि लोककलावंत गेली 17 महिने घरी बसून आहेत. तरी रंगभूमी खुली करावी आणि कलाकारांच्या …
Read More »गृहसंकुलांत कोरोनाचा वाढता प्रसार; नवी मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांतही वाढ झाली आहे. एकूण 1159 प्रतिबंधित क्षेत्र असून त्यात 913 गृहसंकुलांचा, तर 245 रो हाऊसचा समावेश आहे. गावठाण व झोपडपट्टी भागात फक्त एक प्रतिबंधित क्षेत्र आहे. यावरून गृहसंकुलांत कोरोना संसर्ग अधिक असल्याचे दिसते, मात्र यात एकही अतिसंक्रमित …
Read More »मुरूडमध्ये पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड मुरूड ः प्रतिनिधीकोरोनाचे नियम झुगारून मुरूड समुद्रकिनारी मौजमजा करणार्या पर्यटकांवर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या पर्यटकांना दंड ठोठावण्यात आला.शासनाच्या आदेशान्वये जिल्हानिहाय कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार असलेला पॉझिटिव्ह रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या बाबींचा सर्वंकष विचार करून लागू करावयाच्या निर्बंधाबाबत विविध स्तर निश्चित करण्यात आले आहेत. …
Read More »व्हेलच्या उलटीची तस्करी करणार्यास अटक
रायगडातील दुसरी घटना, सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त माणगाव ः प्रतिनिधीव्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अलिबागमधील व्यक्तीला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे बुधवारी (दि. 6) रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटरसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणार्या एकाला पकडले …
Read More »खडसेंना ‘ईडी’कडून धक्का
भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी जावयाला अटक मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी चौधरी यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर त्यांच्यावर …
Read More »काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई ः प्रतिनिधीकाँग्रेस नेते, माजी गृहराज्यमंत्री आणि माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी बुधवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तर भारतीयांचे मोठे समर्थन असलेले कृपाशंकर सिंह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश …
Read More »वारे, कळंब येथे 200 रोपांची लागवड
कर्जत : बातमीदारकोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील कळंब आणि वारे परिसरात 200 झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संगोपन केले जाईल, असे आश्वासन आयोजक दीपक बोराडे यांनी या वेळी दिले. वारे येथील तृप्तेश्वर मंदिर तलाव परिसर तसेच प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण …
Read More »बिरदोले शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रीवाटप
कर्जत : बातमीदारतालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिवंगत किसन जामघरे यांच्या स्मरणार्थ आणि सुशील कालेकर, राजेश कालेकर यांच्या पुढाकाराने बिरदोले गावातील प्राथमिक शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.दहिवली ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच किसन जामघरे यांचे मागील महिन्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सुशील कालेकर आणि राजेश …
Read More »अलिबागेत दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम
अलिबाग ़: प्रतिनिधीलसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यात येणार्या अडचणी तसेच रांगेत उभं राहण्याच्या त्रासामुळे अनेक अपंग कोविड प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित रहात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मंगळवारी (दि. 6) प्रथमच अलिबाग येथे अपंगांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली.सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून दिव्यांग कर्मचारी संघटना आणि अलिबाग तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांचे लसीकरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper