पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या उभारणीसाठी गाभा क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या विमानतळासाठी जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना मात्र सेवा सुविधांच्या बाबतीत अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. चिंचपाडा पुष्पक नोडमधील नागरी आरोग्य केंद्र हस्तांतरण प्रक्रियेतील त्रुटींमुळे बंद आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवा मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र या …
Read More »चिरनेरमध्ये लसीकरण मोहीम
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथे आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेत 55 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरुवातीला 4 ते 10 जून असा लॉकडाऊन करण्यात आला होता. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सुचनेमुळे त्यात पुढील तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. एकूण या 10 …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या व्यापार्यांसह सिडकोच्या एमडींसोबत बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसीतील वाढीव एफएसआय, शिल्लक एफएसआय, पुनर्बांधणी, कन्व्हेंस डिड, एपीएमसीला लागू होणारे सिडकोची धोरणे, भूखंड हस्तांतरण अशा सिडको अखत्यारीत असणारे विविध विषयांसंदर्भात बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या धान्य मार्केट, भाजीपाला, फ्रुट व कांदा बटाटा मार्केटच्या व्यापार्यांसह सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबर बैठक झाली. …
Read More »पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त
पनवेल : वार्ताहर प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केल्यामुळे व तत्काळ उपचार घेतल्यामुळे पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे पनवेलसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. दुसर्या लाटेत कोरोनाचा संसर्ग पनवेलसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता. यात अनेकांचा मृत्युदेखील झाला. कोरोनाची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी …
Read More »नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासा; रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेत नवी मुंबई शहरात झपाट्याने कोरोना संसर्ग पसरल्याने एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळ हा 80 दिवसांपर्यंतखाली आला होता. आता दुसरी लाटेत रुग्ण कमी झाले असून रुग्णदुपटीचा कालावधी 1208 दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना …
Read More »कर्जत तालुक्यातील धरणांची दुरुस्ती कधी?
निसर्गाने नटलेल्या कर्जत तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते. या तालुक्यात डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगले आहेत, त्याचबरोबर पाणी साठवणूक करणारी धरणे, पाझर तलावदेखील आहेत. मात्र दोन पाझर तलाव वगळता इतर पाझर तलाव गेल्या पावसाळ्यात पूर्ण भरून वाहले नाहीत, तर तिन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील ओव्हर फ्लो झाली नाहीत. याला …
Read More »अन्यायी राज्य सरकारचा निषेध आणि महाराष्ट्र बंदची हाक!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वृत्त सार्या महाराष्ट्रात पसरताच राज्य सरकारविरुद्ध …
Read More »राज्यात पुन्हा कठोर निर्बंध? -वडेट्टीवार
पुणे ः प्रतिनिधीराज्यात कोविड निर्बंधांबाबत नवे धोरण अवलंबण्यात आल्यानंतर करोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत असलेल्या अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेत राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी …
Read More »पेट्रोलियममंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरून केंद्रावर केलेल्या टीकेवर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत. येथे काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलचे दर कमी करण्यास सांगावे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी …
Read More »शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय
दरेकरांचा संजय राऊतांना टोला मुंबई ः प्रतिनिधीराजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही आता अशीच चंचल झाली आहे, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper