नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाशी आमचे काही देणेघेणे लागत नाही अशा अविर्भावात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बाजारपेठ भागात मास्क न लावता फिरणार्या व्यक्तींवर ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (दि. 31) दंडात्मक कारवाई केली. ग्रामपंचायत तसेच पोलीस यांनी उघडलेल्या या मोहिमेमुळे शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. …
Read More »चक्क रस्ता गेला चोरीला!
करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा मार्गाची नोंदच नाही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांचा इशारा खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा हा रस्ता चोरीला गेला असून तो शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीत करंबेली ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा ही गावे असून …
Read More »मनपा सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून तळोजात भुुयारी मार्ग, कब्रस्तानची पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील तळोजा येथील पाणी साठणार्या भुयारी मार्गाची तसेच कब्रस्तान व नाल्याची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 31) पाहणी केली.पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अनेक समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याचे काम करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाकूर …
Read More »पालीत मास्क न घालणार्यांवर कारवाई
एका दिवसात 22 जणांकडून 3200 रुपयांचा दंड वसूल पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली शहरात मास्क न लावणार्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावार यांच्या आदेशाने बुधवार (दि. 31) दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात 22 व्यक्तींकडून तीन हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे मास्क न लावणार्यांचे धाबे …
Read More »किल्ले रायगड ते अलिबाग शिवज्योत
शिवजयंतीनिमित्त कुलाबा क्रीडा प्रबोधिनीच्या मावळ्यांचा उपक्रम अलिबाग ः प्रतिनिधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि. 31) साजरी झाली. यानिमित्ताने अलिबागच्या कुलाबा क्रीडा प्रबोधिनीतर्फे किल्ले रायगड ते अलिबागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचे 125 किमी अंतर 12 तासांत शिवज्योत घेऊन धावत 50 शिवभक्तांनी पूर्ण केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे …
Read More »तीन जणांचे बळी घेणार्या स्पॉटवर गतिरोधक
पोलीस प्रशासनाचा पुढाकार कर्जत : बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्गावर सोमवारी झालेल्या अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या राज्यमार्गावरील अपघात प्रवण क्षेेत्रात गतिरोधक उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर सोमवारी (दि. 29) भरधाव वेगाने आलेल्या हुंडाई एक्ससेंट कारने रिक्षेला धडक दिली …
Read More »मुरूड पालिकेत सत्ताधारी-विरोधकांचे साटेलोटे
भाजपचे ज्येष्ठ नेते जनार्दन कंधारे यांचा आरोप मुरूड : प्रतिनिधी शहरातील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, मात्र नगर परिषदेतील विरोधी पक्ष त्याबाबत बोलताना दिसत नाही. अर्थसंकल्पावरदेखील विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मुरूड नगर परिषदेतील विरोधी पक्षांचे सत्ताधारी पक्षाशी साटेलोटे असल्याचे दिसून …
Read More »माजी जि. प. सदस्य अनिल नलावडे भाजपमध्ये
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून स्वागत पोलादपूर ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल नलावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नलावडे यांचे स्वागत केले.या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, शहराध्यक्ष राजा दीक्षित, भाजपचे नेते राजू धुमाळ, …
Read More »कसोटीचा काळ
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भयावह स्वरुप घेत आहे. संपूर्ण देशातील फक्त 10 जिल्हे कोरोनाचा मार सहन करीत आहेत, त्यातील एखाददुसरा जिल्हा वगळता सर्व जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत, असे केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे आपले सत्ताधारी नेते सांगतात. खरे तर यासारखे बेजबाबदार विधान दुसरे नाही. आटोक्यात …
Read More »चांदीवाल समिती म्हणजे धूळफेक!
देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे, मात्र या समितीला न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper