उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध वॉर्डात विकासाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी (दि. 5) शहरातील देऊळवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन व पारचे सुशोभीकरण, बोरी येथील नगरपरिषदचे स्व. दत्ता रहाळकर मैदानाच्या बाजूला असलेल्या नामदेव मंदिर रस्त्याचे व साई नगर येथील रस्त्याचे आदी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा …
Read More »मुंबई स्फोटक कारप्रकरणी भाजप आक्रमक; हात बांधून कोणी आत्महत्या करू शकत नाही -फडणवीस; विधानसभेत खडाजंगी
मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मी मृतदेहाचे …
Read More »पंतप्रधान करणार बांगलादेशचा दौरा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच परदेश दौर्यावर जाणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे त्यांना परदेश दौर्यावर जाता आले नाही. 26 व 27 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौर्यावर जाणार आहेत.बांगलादेश यंदा 50वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे, तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचे जन्मशताब्दी …
Read More »सेंद्रिय पद्धतीने हळदीचे बंपर पीक
सुधागड तालुक्यातील तरुण शेतकर्याची किमया पाली ः प्रतिनिधीमनात जिद्द, कष्ट उपसण्याची तयारी व धमक असेल, तर परिस्थिती कोणतीही असो त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करता येते हे सुधागड तालुक्यातील दिनेश बुरुमकर ह्या होतकरू तरुणाने दाखवून दिले आहे. पिंपळोली येथील प्रयोगशील तरुण शेतकरी दिनेश यांनी अथक मेहनतीच्या जोरावर हळदीच्या पिकाची सेंद्रिय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक घेतली कोरोना लस
पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 5) खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात कोविड-19 अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणार्या ज्येष्ठ …
Read More »मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा : चंद्रकांत पाटील
मुंबई ः प्रतिनिधीतामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडूनही त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मग मराठा आरक्षणावरच स्थगिती का, असा सवाल करीत मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, …
Read More »मालमत्ता कर कमी करा
नवीन पनवेल भाजपची मागणी पनवेल ः प्रतिनिधीनवीन पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी नवीन पनवेलमधील रहिवाशांना आलेल्या प्रस्तावित मालमत्ता कर नोटिसांबाबत रहिवाशांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची शुक्रवारी (दि. 5) भेट घेत निवेदन सादर केले. या वेळी मालमत्त कर कमी करण्याची विनंती करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी …
Read More »फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच 1 एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज
माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधीराज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा गाजत असताना राज्य वीज नियामक आयोगाने 2 टक्के वीज बिल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्याचे आदेश आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »धनगर महासंघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी ऑल इंडिया धनगर महासंघाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आली.कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगर वाडा, खालापूर तालुक्यातील वाशिवली धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील सारसई आपटा धनगर वाडा येथील इयत्ता पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शैक्षणिक कला, …
Read More »नियमांच्या उल्लंघनामुळे नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांत वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. कोरोना आता गेला अशा संभ्रमात काही नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. परिणामी कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. प्रत्येक नोडमध्ये प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुक्त झालेल्या इंदिरानगर, चिंचपाडा परिसरामध्येही पुन्हा रुग्ण आढळू लागले आहेत. काही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper