अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले आहे. टाळेबंदी (लॉकडाऊन) आणि त्यामुळे वाहतुकीवर घातले गेलेले निर्बंध यास कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात 599 अपघातांची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2019च्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी कमी आहे. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे …
Read More »पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस दबावात असल्याने कारवाई होत नाहीए!, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
नागपूर : प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ज्या प्रकारे ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आहेत ते पाहता कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात पोलीस कोणत्या ना कोणत्या दबावात काम करीत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नाहीए, असा आरोप विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकारांशी …
Read More »पुलवामात घातपाताचा कट उधळला; बस स्टॅण्डजवळ सापडली स्फोटके; जवानांची सतर्कता
श्रीनगर : वृत्तसंस्था पुलवामामध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी (दि. 14) दोन वर्षे झाली. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी पुन्हा दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट रचण्यात आला होता, मात्र जवानांच्या सतर्कतेने हा कट उधळला गेला. दहशतवाद्यांनी जम्मू बसस्टॅण्डजवळ दडवून ठेवलेली सात किलो स्फोटके जवानांनी हस्तगत केली. यामुळे …
Read More »देवपाडा शाळा झाली ’स्टडी मॉल’
थिंक शार्प फाऊंडेशनकडून डिजिटल व्यवस्था कर्जत ः बातमीदार कोरोना महामारीच्या कालखंडात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. देवपाडा शाळेत इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे 135 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देवपाडा दुर्गम भागात वसल्याने कोणत्याही प्रकारचे …
Read More »श्रीवर्धन म्हसळा एसटी बायपास मार्गमुळे प्रवासी त्रस्त
संतप्त प्रवाशी वर्गाकडून उपोषणचा इशारा श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन हे रायगड जिल्हयातील एक पर्यटनस्थळ असून हया ठिकाणी राज्यभरातील पर्यटक मोठया संख्येन श्रीवर्धन हया ठिकाणी येत आसतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन हे मध्यवर्ती तालुका आहे. दक्षिणेला फक्त काहि अंतरावर तिर्थक्षेत हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र तर उत्तरेला दिवआगर सुर्वण गणेश प्रसिध्द पर्यटन क्षेत्र असळयाने नेहमीच श्रीवर्धनला …
Read More »पाली शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत
बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी सुधागड ः प्रतिनिधी पाली शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. घोळक्याने फिरणार्या या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पाली नगरपंचायत कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ही समस्या मांडण्यात आली होती. या …
Read More »अमन लॉज-माथेरान शटलसेवेकडे प्रवाशांचा वाढता ओघ
माथेरान ः प्रतिनिधी मध्य रेल्वेची अमन लॉज-माथेरान शटलसेवा पुन्हा सुरू झाल्यापासून 90,753 प्रवाशांची आणि 11,879 पॅकेजेसची वाहतूक झाली आहे. 4 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या आणि माथेरान या गंतव्यासाठी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यामुळे अमन लॉज आणि माथेरानदरम्यानच्या सेवा हळूहळू चारवरून 14पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मागील 101 दिवसांत 90,753 प्रवाशांनी या …
Read More »क्रिकेटच्या मैदानावर डॉक्टरांची फटकेबाजी; पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची क्रीडा स्पर्धा उत्साहात
पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या बिकट परिस्थितीत रुग्णांची सेवा करणार्या कोविड योद्ध्यांना दोन घटका एकत्रित आणण्यासाठी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी पाहावयास मिळाली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, डॉ. बी. जे. …
Read More »चिरनेरचा महागणपती
देवांचा अधिपती श्री गणेशाचे अनेक अवतार आहेत. त्याच अवताराचे प्रतीक म्हणून चिरनेरचा महागणपती प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी गणेश मंदिरे आहेत. महाराष्ट्रात तर अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. चिरनेरचा बाप्पा महागणपती म्हणून ओळखला जातो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती याप्रमाणे आज चिरनेरच्या महागणपती मंदिरात लाखो लोकांचे कर जुळले जातात. भाविक-भक्तांना महागणपतीची …
Read More »स्ट्रॉबेरीच्या शेतीची प्रांत अधिकार्यांकडून पाहणी
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर पनवेल मधील वावंजे गावात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग राबविणार्या सज्जन पवार व प्रशांत पवार या काका पुतण्यांनी राबविला आहे. या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी (दि. 12) भेट देत या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती शेतकर्याकडून घेतली. महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेलमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper