कोर्लई जमीन प्रकरण; 28 जानेवारीला दिल्लीत सुनावणी मुरूड ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या कोर्लई येथील जागेची माहिती प्रतिज्ञापत्रात न दाखवल्यामुळे निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे …
Read More »रायगड कोणाला आंदण दिलेले नाही !
अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना सूचक इशारा पेण : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून, सुनील तटकरे रायगडचे खासदार, तर त्यांची कन्या आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेेत, मात्र रायगड कोणाला आंदण दिलेले नाही असा इशारा शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कोणाचेही नाव न घेता मित्रपक्षांना लगावला …
Read More »फसव्या कंपन्यांकडून कोट्यवधींचा गंडा; दोन वर्षांत 20 गुन्हे दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त झटपट श्रीमंतीच्या मोहात अनेकजण दामदुप्पट देणार्या कंपन्यांच्या जाळ्यात फसत आहेत. अशा गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचे दोन वर्षांत 20 गुन्हे दाखल झाले आहेत, तर फसवणूक होण्यापूर्वीच पोलिसांनी पाच कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कोट्यवधींचा अपहार वेळीच टाळला आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना जादा नफ्याचे आमिष दाखवून लुटणार्या कंपन्यांचे जाळे …
Read More »खारघरमध्ये गोळीबार करणारे अटकेत; व्यवसाय सुरू करण्यासाठी गुन्हेगारी
पनवेल : वार्ताहर पेण येथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (वय 24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर येथे गोळीबार करून फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. विपीन शैलेंद्र ठाकुर (वय 19), गोपाल ननु सिंह (वय 23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (वय 23) आणि मुचन …
Read More »चिरले ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी उपसरपंच आणि ग्रामसेवकांविरोधात तिसर्यांदा तक्रार दाखल; कोकण आयुक्तांचे रायगड जि. प.ला चौकशीचे आदेश
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका दीपक मढवी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य निवृत्ती धनाजी पाटील, तत्कालीन ग्रामसेवक आसावरी रंजित कदम, रघुनाथ द. म्हसे आणि विद्यमान ग्रामसेवक वैभव धनाजी घरत यांनी आपापसात संगनमत करून केवळ पैशाच्या हव्यासापोटी गैरवर्तणूक व अधिकारपदाचा गैरवापर करीत ग्रामपंचायतीची प्रोसिडिंग घरी नेऊन त्यात …
Read More »रयत बँकेचा वर्धापन दिन सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेतील सेवकांची विश्वासार्ह अर्थवाहिनी असणार्या रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचा 80वा वर्धापन दिन सोहळा येथील संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. या वेळी संस्थेच्या रायगड विभागातील …
Read More »मतदार लोकशाहीचा प्राण -तहसीलदार दिलीप रायन्नावर
पाली ः प्रतिनिधी जगातील सर्वांत मोठी सार्वभौम्य लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची ओळख आहे. समानतेची शिकवण लोकशाही देते. अशा लोकशाहीचा प्राण हा मतदार आहे. मतदारांनी जागृत व जबाबदार असले पाहिजे. निःपक्षपातीपणे चांगल्या उमेदवाराला निवडणे हे सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले. येथील ग. …
Read More »रोह्यात विविध सामाजिक प्रतिष्ठान, युवकांचा सन्मान
धाटाव ः प्रतिनिधी डॉ. सी. डी. देशमुख यांच्या पुण्यभूमीत भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र, रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्यासाठी रोह्यातील विविध प्रतिष्ठान व युवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा अलिबाग येथे रायगड जिल्हा प्रभाकर …
Read More »आदिवासी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण
बँक ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्राचे वितरण कर्जत ः बातमीदार आदिवासी समाजातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी ठाकूर कातकरी संघटना पुढे सरसावली आहे. त्या अनुषंगाने बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आठ दिवसांचे रोजगार निर्मितीची माहिती देणारे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आठ दिवस 100 टक्के उपस्थिती लावणार्या 71 आदिवासी महिलांना प्रमाणपत्र …
Read More »संधीसाधू पुढार्यांचा मोर्चा
सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेणे शेतकर्यांना शक्य झाले, तो प्रजासत्ताक शाबूत असल्याचा पुरावाच मानला पाहिजे. प्रजेच्या आवाजाला सरकारदरबारी वजन आणि मान आहे हेच यातून सिद्ध होत नाही काय? ऊठसूठ लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची आरडाओरड करणार्या विरोधीपक्षांनी या निमित्ताने थोडे आत्मचिंतन करावे. अवघ्या विश्वाला अभिमान वाटेल अशा प्रजासत्ताकात रूपांतर झालेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper